लातूर,दि.३१ः लातूरच्या मुलांचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रासेयोच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचा आयटीआयमध्ये आज गुरुवार,दि.३१ मार्च रोजी तब्बल ४० विद्यार्थी -कर्मचारी दात्यांच्या श्वेच्छा रक्तदानाने समारोप करण्यात आला.
लातूरच्या आयटीआय रासेयोच्यावतीने दि.२५ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान उद्यमी तरुण तयार करणेसोबतच.उद्योग उभारणी,बँकींग कर्ज,ऊर्जासंवर्धन,आरोग्य,पर्यावरण,परिसर स्वच्छता,सुसंस्कार,वृक्षसंवर्धनावर भर देणारे विशेष श्रमसंस्कार शिबीर घेण्यात आले. सदर शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचे वैविध्यपूर्ण मार्गदर्शन झाले.विशेष म्हणजे आज गुरुवारी या शिबिराचा ४० दात्यांच्या रक्तदानाने शानदार समारोप करण्यात आला.विलासराव देशमुख वैद्यकीय शिक्षण संस्थेच्या रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.शिवकांता बमणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहा देशमुख,समाजसेवा अधीक्षक सिध्देश्वर चोैधरी,ब्रदर बी.डी.सूर्यवंशी,सहाय्यक तंत्रज्ञ गौरीशंकर स्वामी,शिपाई शाकीर शेख आदिंच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर घेण्यात आले.
वरील सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिरासाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी जी.वाय.देशमुख, गटनिदेशक आर.एन.आकडे,गटनिदेशक सुनील जाधव, गटनिदेशक वसंत ठेले, आनंद शेंद्रे,आर.एन.धनशेट्टी,नरवाडकर,ओझा,सर्व कर्मचारीवृंद व प्रशिक्षणार्थींनी अथक परिश्रम घेवून हे शिबीर यशस्वी केल्याबद्दल प्राचार्या मनिषा बोरुळकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

COMMENTS