धर्माबाद (अहमद लड्डा) निवडणुक निर्णय अधिकारी यांना दबावास भाग पाडणा-या आणि आदर्श आचार संहितेचा उल्ल्घंन करणा-या सहकार निबंधक कार्यालय धर्माबाद येथील कार्यालयीन अधिकारी मुकेश सावळेश्वर जोशी यांना निलंबीत करा
श्री संत नामदेव शिंपी सहकार गृहनिर्माण संस्थेचे निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असुन सदरील निवडणुकीसाठी संस्थेचे सभासद असलेले श्री एस एन बोरसे यांची निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आणि
निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. नमुना ई 4 नियम 18 नुसार उमेदवाराचे नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचे शेवटचा दिनांक 24 मार्च 2022
रोजी दुपारी 03 वाजेपर्यंत होता. परंतु 13 उमदेवारानी दिनांक 23 मार्च 2022 रोजी रात्री 7.33 वाजता निवडणुक निर्णय अधिकारी यांची घरे जाऊन
नामनिर्देशन उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी
अमानत रक्कम ही भरावी लागते परंतु उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी न देता दोन दिवस विलंब म्हणजे दिनांक 25 मार्च 2022 रोजी सकाळी 10.48 मिनिटानी
भरले. तो दिवस म्हणजे उमेदवारी छाननी दिवस होता आणि त्यांच दिवशी दिनांक
25 मार्च 2022 रोजी संस्थेच्या कार्यालयात सहकार निबंधक कार्यालयाचे अधिकारी मुकेश सावळेश्वर जोशी यांनी स्वतः उपस्थित राहुन नामनिर्देशन अर्जा मध्ये खांडाखोड करून दुरूस्ती केली. जे की निवडणुक निर्णय अधिकारी यांना मंजुर नव्हते. आणि विरोधी उमेदवार श्री रमाकांत कोटुरवार यांनी आक्षेप घेतले असताना सुध्दा नैसर्गिक साहनुभूती चा उल्लेख करून विलंबाने दाखल केलेल्या उमेदवाराचे उमेदवारी अर्ज मंजुर करा असे निवडणुक निर्णय अधिकारी यांना दबावास भाग पाडले. आदर्श आचारसंहितेचा
उल्ल्घंन करणा-या अशा सहकार निबंधक कार्यालय धर्माबाद येथील कार्यालयीन अधिकारी मुकेश सावळेश्वर जोशी यांना निलंबीत करण्यात यावी अशी मागणी जनतेत होत आहे.

COMMENTS