*गंगाखेड (प्रतिनिधी)*
नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते स्व. संजय बियाणी यांची दिनांक 5 एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी दिवसा गोळ्या घालून हत्या केली .याच्या निषेधार्थ गंगाखेड येथे दिनांक 7 एप्रिल रोजी माहेश्वरी सभेच्या वतीने शहरातील भगवती चौक ते तहसील कार्यालय पर्यंत मूक मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .सदरील निवेदनात म्हटले आहे की संजय बियाणी थोर सामाजिक कार्यकर्ते होते तसेच त्यांनी नांदेड येथील माहेश्वरी समाजातील गरजू आणि बेघर लोकांना रो-हाऊस व सदनिका अल्पदरात उपलब्ध करून दिल्या होत्या अशा या सामाजिक कार्यकर्त्याची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या होणे अत्यंत निंदनीय बाब आहे .त्यामुळे समस्त राजस्थानी व माहेश्वरी समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. तरी या हत्येला जबाबदार असणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी व माहेश्वरी समाजाला संरक्षण द्यावे असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री, तालुका अध्यक्ष नंदकुमार सोमानी,राजू लोढा,संतोष तापडिय़ा,रामेश्वर तापडिय़ा,
दगडुलाल सोमानी,डाँ.शांतीलाल काबरा,डाँ.सुनील तोष्णीवाल,डाँ.आनंद चाडंक,अँड.मनोज काकानी,बंडू ओझा,आंनद सारडा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


COMMENTS