लातूर/प्रतिनिधी लातूर शहरातील दयानंद सभागृहात 16 व 17 एप्रिल रोजी होणाऱ्या स्मृतिशेष सीताराम धसवाडीकर यांच्या समरणार्थ होणाऱ्या आंबेडकरी साह...
लातूर/प्रतिनिधी
लातूर शहरातील दयानंद सभागृहात 16 व 17 एप्रिल रोजी होणाऱ्या स्मृतिशेष
सीताराम धसवाडीकर यांच्या समरणार्थ होणाऱ्या आंबेडकरी साहित्य
संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन 31 मार्च रोजी भारतीय बौद्ध महासभेचे
राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू
भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. भूषण
जोरगुलवार, डॉ. महादेव गव्हाणे, डॉ. सदाशिव शिंदे, प्रा. सुधीर अनवले,
प्रा युवराज धसवाडीकर, डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे, डॉ. दुष्यन्त कटारे,
डॉ. लहू वाघमारे, प्रा.बापू गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
होती. आंबेडकरी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती
संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. युवराज धसवाडीकर यांनी दिली.


COMMENTS