मौजे खोपेगाव येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला खोपेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेला पाणीपुरवठा करण्यासाठी व तसेच मियावाकी वृक्ष लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची कमतरता जाणवत होती त्या अनुषंगाने ग्रामपंचायतने पंचायत समिती कडे विंधन विहीर ची मागणी केली होती त्या मागणीची गट विकास अधिकारी साहेबांनी लगेच त्या मागणीची दखल घेऊन शाळेसाठी विंधन विहीर मंजूर केला होता त्यांचे ग्रामपंचायतने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्त वर पूर्वसंध्येला त्याचे कामाचा शुभारंभ गावचे प्रथम नागरिक सरपंच श्रीमती तेजाबाई शिवाजीराव मोरे यांच्या नातीच्या हाताने नारळ फोडून करण्यात आला व त्या इंजिन विहिरीला चांगल्या प्रकारे पाणी लागल्यामुळे विद्यार्थी , ग्रामपंचायत व गावकरी यांनी गटविकास अधिकाऱ्यांची आभार मानले.
यावेळी खोपेगावच्या ग्रामसेवक श्रीमती सौ.बनसोडे मॅडम , तंटामुक्ती अध्यक्ष विलास मोरे , रवी मोरे , आदिनाथ मोरे ,रमेश मोरे , मारुती मोरे , विनायक डेंगळे , उपसरपंच अतुल पवार , महादेव वाघमारे नितीन पिटले , ग्राम रोजगार सेवक अमोल घायाळ आदि गावातील मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते

COMMENTS