लातूर, दि. ०७ : येथील अंबाजोगाई रोडवरील आधार मल्टीस्पेशालिटी व मॅटर्निटी हॉस्पिटलच्या वतीने रविवार , दि. १० एप्रिल २०२२ रोजी मोफत सर्वरो...
लातूर, दि. ०७ : येथील अंबाजोगाई रोडवरील आधार मल्टीस्पेशालिटी व मॅटर्निटी हॉस्पिटलच्या वतीने रविवार , दि. १० एप्रिल २०२२ रोजी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन रविवारी सकाळी १० वाजता लातूर शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते एड. दीपक सूळ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपाचे स्थायी समिती सभापती दीपक मठपती, नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर, आरसीसी लातूरचे संचालक शिवराज मोटेगांवकर यांची उपस्थिती राहणार आहे. या शिबिरामध्ये मधुमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संतोष धोंड, स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. नेहा नागरगोजे, डॉ. सौ. दीपा पुरी, दंतरोग तज्ज्ञ डॉ. सुनील पुरी, कान , नाक, घसा व संबंधित कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रदीप खोकले, डॉ.स्नेहा खोकले, डॉ. अनिल मुंढे हे तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना इसीजी, वंध्यत्व निवारण चिकित्सा, रक्त तपासणी, एक्सरे वर ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. रक्तदाब तपासणी , प्रसुतीपूर्व तपासणी मोफत करण्यात येणार आहे. आधार मल्टीस्पेशालिटी व मॅटर्निटी हॉस्पिटल अंबाजोगाई रोडवरील मयूरबन कॉलनी, कॉक्सिट गर्ल्स होस्टेलच्या बाजूस, प्रयागबाई पाटील कॉलेजजवळ आहे. या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अतिदक्षता विभाग, सुसज्ज आंतररुग्ण विभाग, विषबाधा उपचार व हृदयविकारावरील उपचार सुविधा उपलब्ध आहे. या मोफत सर्वरोगनिदान शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आधार मल्टीस्पेशालिटी व मॅटर्निटी हॉस्पिटलच्यावतीने डॉ. संतोष धोंड, डॉ. नेहा नागरगोजे, डॉ. सौ. दीपा पुरी, डॉ. सुनील पुरी, डॉ. प्रदीप खोकले, डॉ.स्नेहा खोकले, डॉ. अनिल मुंढे यांनी केले आहे. -------------------------
|

COMMENTS