लातूर प्रतिनिधी- लातूर ग्रामीण मतदार संघाचे आमदार व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांच्या व...
लातूर प्रतिनिधी-
लातूर ग्रामीण मतदार संघाचे आमदार व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसणानिमित्त आज बुधवार दिनांक ६ एप्रिल रोजी जागृती शुगर अँड अलाईड लिमिटेड कारखाना परिसरात असलेल्या श्री दत्त मंदिर या ठिकाणी श्री दत्त अभिषेक व आरती करून पुजन करून आमदार धीरज विलासराव देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी जागृती शुगरचे व्हा.चेअरमन श्री लक्ष्मणराव मोरे, लातूर शहर जिल्हा कॉग्रेस सेवादलाचे सुपर्ण जगताप, हेळंबचे सरपंच गोरख सावंत, गणेश येवले, शेतकी अधिकारी कदम, जागृतीचे शुगर्सचे अधिकारी, व अनेक मान्यवर उपस्थित होते.
-------------------– ------------------

COMMENTS