लातूर : येथील दयानंद कला महाविद्यालयाच्या ग्रंथपाल वीणा भालचंद्र कुलकर्णी - जेवरीकर या सन २०२० मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथालय शास्त्राच्या ...
लातूर : येथील दयानंद कला महाविद्यालयाच्या ग्रंथपाल वीणा भालचंद्र कुलकर्णी - जेवरीकर या सन २०२० मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथालय शास्त्राच्या ‘सेट' परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल राजर्षी शाहू महाविद्यालयात सुरु असलेल्या अभ्यास वर्गात त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मंचावर ग्रंथपाल विजयकुमार मिश्रा, ग्रंथपाल अंबादास खिल्लारे, ग्रंथपाल सूर्यकांत मस्के, ग्रंथपाल गंगाधर जोगदंड हे उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना वीणा कुलकर्णी म्हणाल्या की, कुठल्याही परीक्षेत यश मिळवायचे असेल तर त्यासाठी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम व योग्य मार्गदर्शन हवे असते. माझ्या यशात मी केलेला अभ्यास व मला लाभलेल्या अनेक गुरुजनांचे मार्गदर्शन याचे योगदान आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजर्षी शाहू महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल स्व. दाडगे हे माझे प्रेरणास्थान असून ग्रंथपाल मिश्रा, ग्रंथपाल मस्के व माझ्या दयानंद शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.
या प्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS