माहूर येथे दत्तशिखराच्या पायथ्याशी आद्य जगतगूरू शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त महाआरती संपन्न


       राम दातीर 

 माहूर (प्रतिनिधी ) आद्य जगतगूरू शंकराचार्य यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते केदारनाथ येथे शंकराचार्यां समाधीपूजन व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.त्या अनुषंगाने संपूर्णदेशातील प्रमुख तिर्थक्षत्रावर शंकराचार्यांच्या पादुकांचे पूजन व संत महंताचा सन्मान करण्यात यावा असे आवाहन केले. त्यानुसार महाराष्ट्रातील 9 तिर्थक्षेत्राची निवड करण्यात आली होती.हा कार्यक्रम राबविण्या करिता भाजपा प्रदेश कार्यालयाने माहूर या तिर्थक्षेत्राची निवड केली होती.शंकराचार्यांनी दत्त शिखराच्या पायथ्याशी तपश्चर्या केली होती तसेच त्यावेळी दत्तशिखर संस्थान तर्फे शंकराचार्यांना धर्मदंड देउन हिंदू धर्मकार्य करण्यासाठी आदेश दिला.त्या ठिकाणी शिखर संस्थानचे मुख्य पुजारी वासुदेव भारती,अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शामबापू भारती महाराज,नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर व किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम,यांच्या हस्ते शंकराच्यार्यांच्या पादुकांचे पूजन करून महाआरती करण्यात आली.


तद्नंतर शिखर संस्थानचे महंत प.पू.परिव्राजकाचार्य मधुसूदनजी भारती यांच्या पादूकांचे पूजन व महाआरती करून त्यांचे आशीर्वाद घेतले या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा पुजारी विजय आमले यांनी केले.

स्थानिक बालाजी मंगलम येथे केदारनाथ येथे संपन्न होणार्‍या शंकराचार्यांच्या समाधीपूजन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.यावेळी शारदासूत खामनकर यांच्या नेतृत्वात शहरातील काकडा आरती, (दिंड्या) मंडळाने आपली भजनरुपी सेवा अर्पण केली.तसेच यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर व आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते धर्मकार्यात वाहून घेतलेल्या महापूरुषांचा सन्मान केला.व खासदार चिखलीकर, आमदार केराम यांच्या हस्ते आयुष्यमान उज्वला योजनेचे गँस वाटप करण्यात आले.यावेळी मराठवाडा संघटक संजय कोडगे, माधव पाटील उचेकर,संघटन मंत्री सूधाकर भोयर,संदीप केंद्रे,संध्याताई राठोड,यांचेसह कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट /माहूर विधानसभा अध्यक्ष अॅड.रमण जायभाये,जिल्हाउपाध्यक्ष सुमित राठोड,माजी नगराध्यक्ष समरभाउ त्रिपाठी,अनिल वाघमारे,नंदकुमार जोशी,पत्रकार प्रकोष्ट जिल्हाध्यक्षा सौ पद्मा गिऱ्हे,तालूका अध्यक्ष अॅड.दिनेश येउतकर,शहराध्यक्ष गोपू महामूने,महीला शहराध्यक्षा अर्चना दराडे,राजु दराडे,संजय पेंदोर,संतोष तामखाने,अर्जुन मोहिते,नीळकंठ मस्के यांनी अथक परिश्रम घेतले,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागोराव सूर्वे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रागीताने करण्यात आली.यावेळी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

टिप्पण्या