गंगाखेड/प्रतिनिधी:-
आज दिनांक 1 नोव्हेंबर सोमवार रोजी सिकंदराबाद रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर मा.श्री गजाननजी माल्ल्या यांनी गंगाखेड येथे रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे विभागाकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधेसह इतर बाबींचा आढावा घेण्याकरिता आले असता यावेळी आमदार डॉ. रत्नाकररावजी गुट्टे यांनी त्यांचे स्वागत केले. गंगाखेड मतदारसंघात रेल्वे विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामांची निवेदनाद्वारे मागणी केली.
यामध्ये गंगाखेड येथील रेल्वे उड्डाण पूल क्रमांक 2 च्या बांधकामास तात्काळ मंजुरी द्यावी,गंगाखेड शहरातील रेल्वे गेट क्रमांक 16 व 17 दरम्यान भगवती नगर येथे कासारवाडी रोडवर भुयारी मार्गाचे बांधकाम करणे, गंगाखेड येथील बस स्थानक लगत असलेल्या रेल्वे विभागाच्या मालकीच्या जागेवरील गार्डन निर्मितीचे काम तात्काळ सुरू करणे किंवा सदरील जागा स्वच्छ करून त्यावर वृक्षलागवड करणे, गंगाखेड येथे शेतकरी व्यापारी उद्योग इत्यादींच्या सोयीकरिता गुड्स शेड निर्मिती करणे, वडगाव सुरळवाडी गंगाखेड नागठाणा येथील सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम तात्काळ पूर्ण करणे, तसेच शिर्डी - काकीनाडा, कोल्हापूर - धनबाद, कोल्हापूर - नागपूर, अमरावती-पुणे या जलद गती रेल्वे गाड्यांना गंगाखेड येथे थांबा मिळावा, त्याचबरोबर नांदेड-पुणे नवीन जलदगती रेल्वे सुरू करण्यात यावी, अकोला-परळी, निजामाबाद - पंढरपूर, परळी-पूर्णा, कुर्ला मुंबई ते नांदेड, या पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, गंगाखेड येथे नवीन तीन क्रमांकाचा रेल्वे ट्रॅक टाकून प्रवाशांकरिता सर्व सोयींनी युक्त शौचालयाची निर्मिती करण्यात करावी, पूर्णा येथे बुद्ध विहार ते सिद्धार्थ नगर येथे फुट ओव्हर ब्रीजची निर्मिती करावी, पूर्णा येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह सेवेत कार्यरत असलेले कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकरिता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची निर्मिती करावी, पूर्णा येथे रेल्वे विभागाची इंग्रजी, मराठी, तेलगू शाळा आणि ज्युनियर कॉलेज व तसेच सी. एन.डब्ल्यू. ऑफिस आणि इतर विभागीय कार्यालय पुन्हा सुरू करावेत, रेल्वे कॉलनी पूर्णा येथील पाण्याच्या टाकीमधून परिसरातील नागरिकांना पाणी देण्यात यावे या इत्यादी मागण्यांचे आमदार गुट्टे यांनी निवेदन दिले.
आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे व सिकंदराबाद रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर श्री माल्या यांच्यामध्ये जवळपास ३० मिनिटे सकारात्मक चर्चा झाली. आमदार गुट्टे यांनी प्रस्तावित रेल्वे गार्डनचा परिसर अधिकाऱ्यांना फिरून दाखवला.
याप्रसंगी. रासपचे मुख्य महासचिव बालासाहेबजी दोडतले,जि.प.सदस्य किशनराव भोसले, रासप जिल्हाध्यक्ष संदीप पाटील अळणुरे, तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, नगरसेवक सत्यपाल साळवे, राधाकिशन शिंदे,पं.स.स. लक्ष्मण आप्पा मुंडे, राजू खान,शेख खालिद भाई, अनिल यानपल्लेवार, सतीशभाऊ घोबाळे, अशोकभाऊ घोबाळे, महेश आप्पा शेटे,संजय पारवे, सचिन महाजन,सचिन नाव्हेकर, वैजनाथ टोले, उद्धवभाऊ शिंदे, रुस्तम भाई इत्यादी पदाधिकार्यांसह रासप व गुट्टे काका मित्रमंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS