नांदेड: नवीन नांदेडातील वसरणी येथील रहिवासी तथा ट्रक चालक तुळशीराम कोंडीबा पोवळे (वय-५० वर्षे) यांचे दीर्घ आजाराने ४ नोव्हेंबर रोजी रात्री न...
नांदेड: नवीन नांदेडातील वसरणी येथील रहिवासी तथा ट्रक चालक तुळशीराम कोंडीबा पोवळे (वय-५० वर्षे) यांचे दीर्घ आजाराने ४ नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले. दिवंगत तुळशीराम पोवळे यांच्या पार्थिव देहावर शुक्रवार दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी वसरणी परिसरातील गोदावरी नदीच्याकिनारी असलेल्या नावघाट स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. एस. टी. अर्थातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बसचालक आनंद पोवळे व खाजगी वाहन चालक जनार्दन पोवळे यांचे 'ते' भाऊ होत. तुळशीराम पोवळे यांच्या अकाली निधनाबद्दल वसरणी तसेच धनेगाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS