दि.27/10/2021 रोजी शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षक आमदार मा.कपिल पाटील साहेब यांनी वाघी शाळेस धावती भेट दिली. भेटी दरम्यान...
दि.27/10/2021 रोजी शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षक आमदार मा.कपिल पाटील साहेब यांनी वाघी शाळेस धावती भेट दिली.
भेटी दरम्यान-मिशन आपुलकी या उपक्रमा अंतर्गत शाळेतील माजी विद्यार्थी यांच्या लोकसहभागातून जमा झालेल्या निधीतून वाघी शाळेत
"माझी अभ्यासिका-संविधान सदन " या अभ्यासिकेचे उदघाटन करण्यात आले.
मा.आमदार महोदयांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी हितगुज साधला.अंधश्रद्धा नष्ट करून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारले पाहिजे असे सूतोवाच केले.
आमदार महोदयांनी शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयावरील अनेक प्रश्न विचारले.सर्वच प्रश्नांची मुलांनी उत्तरे दिली.साहेबांनी शाळेच्या गुणवत्तेचे कौतुक करून सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
सदर भेटी प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,
मुख्याध्यापक व 90% विद्यार्थी उपस्थिती होती.
COMMENTS