उत्कृष्ट वादक , अभ्यासू स्वरलिपी लेखक आणि भावुक संगीततज्ञ म्हणुन सुपरिचित असणारे जोग अनेक मराठी हिंदी संगीतकारांचे हक्काचे सहाय्यक म्हणुन का...
उत्कृष्ट वादक , अभ्यासू स्वरलिपी लेखक आणि भावुक संगीततज्ञ म्हणुन सुपरिचित असणारे जोग अनेक मराठी हिंदी संगीतकारांचे हक्काचे सहाय्यक म्हणुन कार्यरत होते ! ते स्वत: उत्तम संगीतकार होते ! सुधीर फडके यांच्या *गीतरामायण* कार्यक्रम ते कायम वादक म्हणुन साथीला असत ! यशवंत देव , सुधीर फडके व प्रभाकर जोग हे तिघेही संगीतकार पण *स्वर आले दूरुनी , जुळल्या सगळ्या त्या आठवणी* हे गीत या तिघांचे म्हणजे देवकाका गीतकार , बाबुजी गायक तर जोग हे संगीतकार ! सुखद योगायोग !
प्रभाकर जोग यांच्या निधनामुळे एक दर्जेदार वादक आणि श्रवणीय संगीतकार काळाच्या पडद्याआड गेला - 🙏🏼
*लपविलास तू हिरवा चाफा*-
*सुगंध त्याचा छपेल कां ?*
*प्रीत लपवूनी लपेल कां ?*~
ग्लोबल मराठवाडा च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
COMMENTS