नांदेड 31 :- 90-देगलूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी आज एकुण 412 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जिल्हा...
देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी एकुण पुरुष मतदार 1 लाख 54 हजार 92 तर एकुण स्त्री मतदार 1 लाख 44 हजार 256 एवढे आहेत. इतर मतदार 5 असे धरुन ही एकुण मतदारांची संख्या 2 लाख 98 हजार 353 एवढी आहे. यापैकी आज झालेल्या मतदानात 1 लाख 90 हजार 800 एवढ्या एकुण मतदारांनी आपला मतदानाचा हक्क व राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. यात पुरुष 1 लाख 768 मतदार तर स्त्री 90हजार 31 मतदार तर इतर 1 मतदार असा समावेश आहे. मतदानाची एकुण टक्केवारी ही 63.95 टक्के एवढी आहे.
ही निवडणूक सुरळीत पार पडण्याच्यादृष्टीने प्रशासनाच्यावतीने 1 हजार 648 कर्मचारी आणि 29 क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. या निवडणूकीत 412 मतदान केंद्रावर मतदान झाले आहे.
0000
COMMENTS