सोनपेठ/प्रतिनिधी
तालुक्यातील डिघोळ(ई)येथे ८ ऑक्टोंबर रोजी विधी सेवा समिती सोनपेठ व डिघोळ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पॅन इंडिया जागृत आणि पोहोच अभियान कार्यक्रम पार पडला.राष्ट्रीय विधी सेवा आयोग नवी दिल्ली यांच्या आदेशाने आजादी का अमृत महोत्सव साजरा करताना पॅन इंडिया कायदेविषयक व पोहोच कार्यक्रमानिमित्त तालुका विधी सेवा समिती सोनपेठ,वकील संघ सोनपेठ आणि ग्रामपंचायत डिघोळ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ऑक्टोंबर रोजी कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून सोनपेठ येथील दिवानी न्यायाधीश एस.एस.खिरापते व प्रमुख पाहुणे म्हणून सोनपेठ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे,सोनपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे व तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड.मोकाशे होते. या कार्यक्रमासाठी सरपंच राधाबाई शिंगाडे व ग्रामसेवक संदीप सोळंके,उपसरपंच अजयकुमार देशमुख यांनी पुढाकार घेतला होता.सर्वप्रथम गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या योजनांविषयी व पंधराव्या वित्त आयोगाविषयी गावकऱ्यांना माहिती दिली.सोनपेठ वकील संघाचे अँड.मोकाशे यांनी महिलांच्या हक्काविषयी संविधानिक अधिकाराविषयी मार्गदर्शन केले व अँड.अशोक तिरमले यांनी आरोपी व न्याय बंदीचे अधिकार या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.पोलीस निरीक्षक काकडे यांनी शेतीविषयक कायदे व दारूबंदी विषयी उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन करून अध्यक्षीय समारोप न्यायमूर्ती खिरापते यांनी वैकल्पिक वाद निवारण पद्धती म्हणजे काय व तडजोडी बाबत अवलंबण्यात येणारे मार्ग तसेच वैकल्पिक वाद निवारण पद्धतीचे फायदे व राष्ट्रीय विधी सेवा समितीकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर उपस्थित गावकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य वैभव खंदारे यांनी केले.तर प्रास्ताविक शुक्ला यांनी केले.यावेळी उपस्थित डिघोळ गावचे उपसरपंच अजयकुमार(भैय्या)देशमुख यांनी ग्रामपंचायतच्या वतीने विधी सेवा समितीचे व उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.यावेळी उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी जिल्हा परिषदेचे शिक्षक ज्येष्ठ नागरिक व सर्व गावकरी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सद्दाम सय्यद,गणेश शिंदे,आकाश शिंदे,अरुण शिंदे,गंगाधर शिंगाडे, नागनाथ शिंगाडे,भास्कर बोकन,नबी साहब,अजय गायकवाड,अमोल शिंदे,मोसीन शेख,किरण गायकवाड,विलास शिंदे,जब्बार शेख,प्रकाश चव्हाण आदींनी सहकार्य केले.
COMMENTS