-------------------------------------------------------------------
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या ( I LO ) सहकार्याने महाराष्ट्र हिंद मजदूर सभा संचालित जनरल मजदूर सभेच्या अध्यक्षा संज्योत वढावकर व जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांच्या पुढाकाराने ७ ऑक्टोबर २०२१ रोजी ठाणे व पनवेल येथील असंघटीत कामगारांसाठी कामगार सहाय्य सेवा केंद्राचे ऑफलाईन व ऑनलाईन उदघाटन झाले.
जागतिक महामारीच्या काळात कामगारांचे रोजगार, असंघटीत कामगारांच्या स्थलांतरित होताना हालअपेष्टा, राज्य व केंद्र सरकारच्या कामगार कल्याणकारी योजना, शेतकरी व कामगार विरोधी कायदे या महत्वांच्या विषयावर हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजन सिंग सिद्धू, आय.एल. ओ. चे डेप्युटी डायरेक्टर ब्रदर सतोशी ससाकी, आशिया अँड पॅसिपीक ऑफिसचे डेस्क ऑफिसर ब्रदर एरियल कॅस्ट्रो, साऊथ आशिया आय. एल. ओ. ऑफिसचे ऑफिसर ब्रदर सय्यद सुलतान, डेप्युटी लेबर कमिशनर (ठाणे ) संतोष भोसले, असिस्टंट लेबर कमिशनर सारिका राऊत यांची मार्गदर्शन व शुभेच्छापर भाषणे झाली, संजय वढावकर यांनी प्रास्ताविक भाषण केले, तर आयटकचे कॉ. उदय चौधरी, सिटुचे कॉ. वर्तक, इंटकचे दिवाकर दळवी, भिवंडीचे विजय खाने, पनवेल केंद्राच्या प्रमुख श्रुती म्हात्रे, , नुसीचे जनरल सेक्रेटरी अब्दुल गणी सारंग, सांगली हिंद मजदूर सभेचे नेते विकास मगदूम यांनी असंघटीत कामगारांसाठी सुरू केलेल्या कामगार साहय्य सेवा केंद्राच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. संज्योत वढावकर यांनी सुत्रसंचालन केले तर आभार श्याम जोशी यांनी मानले.
याप्रसंगी हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलचे निवृत्ती धुमाळ, संदीप शिंदे, कल्पना देसाई, विद्याधर राणे, मारुती विश्वासराव, त्रिशिला कांबळे, अमरसिंग ठाकूर, रानडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
हिंद मजदूर सभा, महाराष्ट्र
COMMENTS