*माणुसकीच्या शोधातून बाळासाहेब आरबाड लढतायत मृत्यूशी* *दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज!तर कुटुंबीयांकडून मदतीचे आवाहन*

सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी कोरोनाच्या महाभयंकर आजारात खरंच माणुसकीचे नाते विसरले गेलंय का?असा सवालच आता उपस्थित होत असून एक उमद्ये तरुण शिवसेना ...


सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी

कोरोनाच्या महाभयंकर आजारात खरंच माणुसकीचे नाते विसरले गेलंय का?असा सवालच आता उपस्थित होत असून एक उमद्ये तरुण शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड व ज्ञानोबा आरबाड यांची अपघातातील दुर्घटनेत झालेल्या जखमासोबत मृत्यूशी झुंज चालू आहे.याबाबत सविस्तर असे की,विटा(बु.)शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड व ज्ञानोबा आरबाड कामानिमित्त परभणी येथे जात असताना रस्त्यात त्यांच्या दुचाकींचा अपघात झाला यात बाळासाहेब आरबाड हे गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत असल्याने पाथरी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांना परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता बाळासाहेब आरबाड यांच्या मेंदूला गंभीर इजा झाल्याने त्यांना न्यूरॉसर्जन असणाऱ्या नांदेड येथील यशोसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तेथील खर्च आवाक्याबाहेर असल्याने काही सामाजि


क कार्यकर्त्यांनी गावातून वर्गणी करत लाख रुपयांची मदत केली मात्र रुग्णालयातील न्यूरॉसर्जन डॉ.ऋतुराज जाधव यांनी रुग्ण शुद्धीवर येण्यास वेळ लागेल असे कळवत दिलासा दिला खरा मात्र रोजच्या खर्चाचा ताळमेळ पहाता बाळासाहेब आरबाड यांच्या झुंजीत आर्थिक मदत करण्याची गरज कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.एरव्ही कोणालाही संकट येताच धावत जाणाऱ्या बाळासाहेब यांच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी शिवसेना पुढे येईल का?अशीही विनंती त्यांच्या मित्रपरिवाराकडून केली जात आहे.संबधीत घटनेची माहिती परभणीचे खा. बंडू जाधव यांना मिळताच त्यांनी बाळासाहेब आरबाड यांचे बंधू प्रा.कैलास आरबाड यांची भेट देऊन घाबरु नका म्हणत थोडेसे आर्थिक दायित्व घेतले असल्याची माहिती आहे.माणुसकीच्या शोधातून मृत्यूशी झुंज देणाऱ्या!बाळासाहेब आरबाड यांच्यासाठी दानशूर व्यक्तींनी या उमद्या शिवसेना कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी पुढे येऊन मदत करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.तर कुटुंबातील सदस्यांनी यासाठी मदतीचे आवाहन केले आहे.

*संघर्षंशील बाळासाहेब*

संघर्षशील असणारे बाळासाहेब आरबाड यांच्याघरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.अल्पभूधारक शेतकरी असणारे बाळासाहेब आई-वडील व लहान भाऊ यांच्यासह गावात राहतात असा त्यांचा परिवार आहे.बाळासाहेब हे छोटी-मोठी गुत्तेदारी करतात. त्यांचे भाऊ प्रा.कैलास आरबाड हे एका विना अनुदानित महाविद्यालयात वर्ग शिकवणीचे काम करतात.

शालेय जीवनात असल्यापासून बाळासाहेब आरबाड हे संघर्षशील असल्याने त्यांनी सोळा वर्षांपूर्वी एका साखर कारखान्यात कामगार कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत राजकिय पदार्पण केले आहे.लोकांच्या मदतीला धावून जाणारे बाळासाहेब अशी त्यांची ओळख झाल्याने सोशल मीडियावर युवकांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी ट्रेंड चालवला आहे.

मदतीसाठी त्यांचे भाऊ कैलास आत्माराम आरबाड यांच्या फोन पे क्रमांक ७०५७६०५७७७ या नंबरसह बँक खाते क्रमांक:-६२१०४५६२६२१

आय.एफ.एस.सी.कोड:-SBIN0020373

वर मदत करण्याचे आवाहन केले जात आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group