माहूर (प्रतिनिधी )माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेल्या 80 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा दि. 14 ऑक्टो. रोजी दु.1 वा. मृत्यू झाला. सदर इसमाच्य...
माहूर (प्रतिनिधी )माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेल्या 80 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा दि. 14 ऑक्टो. रोजी दु.1 वा. मृत्यू झाला.
सदर इसमाच्या मृत्यूची सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्यावरून माहूर पोलिसांनी त्या इसमाची पाहणी करून पंचनामा केला. त्याच्या जवळ ओळखीचा कुठलाही पुरावा आढळून आला नाही.पोलिसांनी त्या मृत्यूची आकस्मिक अशी नोंद घेतली आहे.सदर अनोळखी व्यक्तीची कुणाला माहिती असल्यास त्यांनी 9923388510 या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन पो. नि. नामदेव रिठ्ठे यांनी केले आहे.
COMMENTS