परभणी : येथील मराठवाडा साहित्य परिषद शाखा व बी. रघुनाथ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ' अक्षर भेट '... एक मुक्त संवाद या उपक्रमांतर्गत बी.रघुनाथ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित निमंत्रितांचे कवी संमेलन बी. रघुनाथ महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार ( दि.२३ ) रोजी कविंनी सादर केलेल्या बहारदार कवितांनी रंगले. कवी संमेलनाच्या सुरवातीला कवी बी. रघुनाथ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रसिद्ध कथाकार डॉ. आसाराम लोमटे , कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी केशव बा. वसेकर , मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणीच्या अध्यक्ष सरोज देशपांडे , उपाध्यक्ष बा.बा.कोटंबे , मोहन कुलकर्णी, तुकाराम खिल्लारे यांची उपस्थिती होती. कवी संमेलनाची सुरुवात बी. रघुनाथ यांच्या ' सांज ' या कवितेच्या वाचनाने झाली. कैलास सुरवसे यांनी आपल्या कवितेतून ' दुष्काळाच्या झळांच चित्रण ' मांडले. तर सुवर्णा मुळजकर यांनी ' स्वप्नी मी मला पाहिले मरताना ' ही कविता सादर करून श्रोत्यांना अंतर्मुख केले. सुनंदा देशमुख यांनी ' भाव वेडे शब्द माझे कविता तू जुळवून ये ' ही रचना सादर केली. रवी कात्नेश्वरकर यांनी ' आम्हाला न कळे रित युगाची ' या कवितेतून दोन पिढ्यांचे अंतर सांगितले. मारूती डोईफोडे यांनी ' शहरातल्या बंगल्यात हरवलेल्या पोराच्या आईची व्यथा ' आपल्या कवितेतून चित्रीत केली. शरद ठाकर यांनी ' आजी ' , डॉ. अशोक पाठक यांनी ' हेच तर पाहिजे होत त्यांना ', मधुरा उमरीकर यांनी ' आपापल्या मातीची जाणिव व्हावी', तर संजीवनी खोत यांनी ' शब्दांचे नाते 'ही कविता सादर केली. मोहन कुलकर्णी , तुकाराम खिल्लारे यांनी सादर केलेल्या कवितांनी रसिक भारावून गेले. महेश देशमुख यांनी ' मी एक स्वतंत्र विचारांचा कवी ' , माधव गव्हाणे यांनी ' खरंच राव इंडिया आहे ग्रेट ' , महेश कोरडे यांनी ' अवकाळी पाऊस ', ही कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दिगंबर रोकडे, गझलकार अरविंद सगर, अमोल देशमुख , प्रा. हनुमान व्हरगुळे , अप्पा वडीकर, भानुदास धोत्रे , अनिल मुळजकर यांनी आपल्या कवितेतून रसिकांची मने जिंकली. कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी केशव बा. वसेकर यांच्या ' कवितेचे बांधकाम ' या कवितेने कवी संमेलनाचा समारोप झाला. प्रास्ताविक सरोज देशपांडे यांनी केले. सुरेश हिवाळे यांनी कवी संमेलनाचे बहारदार सुत्रसंचलन केले. तर आभार प्रदर्शन प्रा.भगवान काळे यांनी केले. त्र्यंबक वडसकर, माणिक पुरी , प्रा. हनुमान व्हरगुळे, मसाप च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
फोटो ओळी परभणी : येथील मराठवाडा साहित्य परिषद व बी. रघुनाथ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवी संमेलनात कविता सादर करताना ज्येष्ठ ...
Global Marathwada
[विशेष न्युज]
/gi-clock-o/ Latest News$type=list
-
राम दातीर माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. स्व...
-
नांदेड, दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा कें...
-
नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील ल...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts
/gi-fire/ YEAR POPULAR$type=one
-
राम दातीर माहूर (प्रतिनीधी )तालुक्यातील पाचोन्दा येथे आज दुपारी दुहेरी हत्याकांड घडल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. स्व...
-
नांदेड, दि. १० फेब्रुवारी :- जिल्ह्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज ११२ परीक्षा केंद्रावर झाला.या परीक्षा कें...
-
नांदेड, दि. 17 फेब्रुवारी :- इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आज धर्माबाद येथील ल...
-
नांदेड दि. 20 फेब्रुवारी :- आज इयत्ता 10 वीची परीक्षा जिल्ह्यातील 178 केंद्रांवर सुरू झाली. मराठी विषयाच्या पेपरसाठी नोंदणीकृत 44 हजार 991 प...
-
सताधारी संचालक मंडळाने कोणतेही ठराव पारीत न करता केले सभेतून पलायन - नांदेड :( वार्ताहार ) *सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ...
-
नांदेड:(दि.९ ऑक्टोबर २०२५) यशवंत महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाद्वारे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान पीएम-उषा योजना ...
-
नांदेड:( दि.३० जानेवारी २०२६) श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पालक शिक्षक समितीच्या वतीने दि. ३१ जानेवारी, ...
-
ड्रोन, व्हिडिओ कॅमेरे व झूम वेबकास्टद्वारे नांदेड दि. 16 फेब्रुवारी :- इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील भौतिकशास्त्र व...
-
नांदेड: राज्यात फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरळीत वातावरणात पार पाडण्यासाठी ना...
COMMENTS