प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
अधिकारी म्हंटले कि मोठ्या पगाराची नौकरी आपण अनेकदा पाहिलेच असेल अधिकाऱ्यांच्या मुलांचा वाढदिवस म्हंटले की मोठा थाट बाट आलाच तसेच ईतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या हाँटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी पण या सर्व प्रकाराला बगल देणारेही काही सामाजिक बांधीलकी जपणारे अधिकारीही असतात त्यापैकी एक हिंगोली पोलिस दलात कार्यरत हट्टा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस शनिवारी आपल्या परिवारासह परभणी येथील बालगृह, वृद्धाश्रमात साजरा केला. 9 आँक्टोबर रोजी पोलिस अधिकारी गजानन मोरे यांची मुलगी कुमारी श्रीजा हीचा दुसरा वाढदिवस होता. यापुर्वी ही मोरे यांनी मुलीचा पहीला वाढदिवस अनाथ, गरीब, गरजूंना मदत करून साजरा केला होता. शनिवारी दुसरा वाढदिवस ही गजानन मोरे यांनी परभणी येथील वृद्धाश्रम आणि बालगृह येथील महिला पुरुष आणि अनाथ बालके यांच्यासमवेत साजरा करून वृद्धाश्रमातील 26 महिला आणि 11 पुरुषांना फळ, मिठाई व थंडीपासून बचाव होण्यासाठी स्वेटर चे वाटप केले. यावेळी वृद्धाश्रमातील महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.तसेच बालगृहातील 12 मुलांना खाऊ, मिठाई व थंडीत घालायचे जँकेट वाटप केले. मुलांना तळाच्या फोडा प्रमाणे जपणारे जन्मदात्या आई वडिलांना मुलाच्या निर्दयी वागणूक मुळे वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. परंतु गजानन मोरे सारख्या सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या मुलांमुळे या वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना जिवन जगण्याचा आधार मिळतो. पोलिस अधिकारी म्हणून सर्वसामान्यांना न्याय मिळून देण्याचे काम तर गजानन मोरे हे नेहमी करतातच परंतु आपल्या कर्तव्या बरोबरच सामाजिक बांधीलकीही जोपासण्याचे काम करतात. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच गजानन मोरे यांच्या सामाजिक कार्यास ग्लोबल मराठवाडा न्यूज चा सलाम. तसेच त्यांची मुलगी श्रीजा ला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना...
COMMENTS