नवचेतना सर्वांगीन विकास केंद्र, केजच्या संस्थापक सचिव मनिषा घुले यांच्यावर फसवणुकिचा गुन्हा दाखल.

नवचेतना महिला सर्वांगीण विकास केंद्र या सामाजिक संस्थेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह......? "नवचेतनाने समाजाच्या विश्वासाचा केला घात...

नवचेतना महिला सर्वांगीण विकास केंद्र या सामाजिक संस्थेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह......?

"नवचेतनाने समाजाच्या विश्वासाचा केला घात".

केज! प्रतिनिधि!

अगोदरच भ्रष्टाचाराने बरबटल्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या व संपूर्ण बिड जिल्हयामध्ये बहुचर्चित,नवचेतना सर्वांगीन विकास केंद्र, नवचेतना मल्टीपल निधि( बँक ) व नवचेतना महिला उद्योग, या संस्थेच्या संस्थापक सचिव मनिषा सिताराम घुले यांच्यावर आज दि, 09/10/2021, रोजी केज पोलिस स्टेशनमध्ये कलम, भा.द.वि.४२०, ४६५, ४७१, ५०६ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल नोंद करण्यात आला आहे. तब्बल एक महिन्यापासून चर्चेत असणारी केज येथील, थोडयाच दिवसात नावारूपाला आलेली सामाजिक संस्था नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र बनले भ्रष्टाचार व फसवणुकिचा अड्डा ?सामाजिक कामात कार्यरत असणाऱ्या सदरील संस्थेने, या संस्थेच्या भागभांडवलदार महिला, ज्योती सांबरे व विजया कांबळे सह इतर संचालकांची व कर्मचाऱ्यांची फसवणूक करून लाखो रुपयांचा निधि स्वतःच हडप केला परंतू ज्या महिलांनी नवचेतना संस्था उभा करण्याच्या तसेच नावारूपाला आणण्याच्या कामी आपले सर्वस्व पणाला लावून तन, मन, धन अर्पण करून मेहनत करुन काबाडकष्ट केलेल्या ,अशा एकल महिलांना अश्चरश: हाकलून देवून त्यांच्या भागभांडवलावर डल्ला मारला, अगोदरच भ्रष्टाचाराच्या संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या संस्थेच्या संस्थापक सचिव मनिषा घुले यांनी या महिलांची आर्थिक फसवणूक करून व भ्रष्टाचार, गैरव्यवहार करून लाखो रुपये हडपले, तसेच विचारणा केली असता, त्या भागभांडवलदार एकल महिलांना धमकी देवून बाहेरचा रस्ता दाखवला. सदरील महिला या एकल महिला असून त्या नवचेतना संर्वांगीण विकास केंद्राअंतर्गत चालणाऱ्या नवचेतना मल्टीपल निधि( बँक) व नवचेतना महिला उद्योग,च्या भागभांडवल धारक असून सदरील संस्थेत कर्मचारी म्हणून हि काम पहात होत्या. संस्थापक सचिव मनिषा घुले यांनी त्यांचे दोन महिन्यांचे मासिक वेतन सुद्धा दिले नसून, लाखो रुपये भागभांडवलावर मोठा डल्ला मारला.

    मागील कांही दिवसापासून सदरील संस्थेच्या संस्थापक सचिव मनिषा घुले यांनी संस्थेच्या नावाखाली केलेला भ्रष्टाचार उघड झाला. हा भ्रष्टाचार व गैरव्यवहारा विषयी या दोन महिलांनी माहिती तर बाहेर लिकिज केली नाही ना ? या संशयावरून यांना संस्थेतून काढून टाकले, परंतू सदरील संस्थेच्या भ्रष्टाचाराविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यापासून, ज्योती सांबरे, विजया कांबळे सह चार सदस्यांनी संस्थेचा सामुहिक राजीनामा दिला, पण या संस्थापक सचिव

 महाशयांनी या दोन महिलांच्या सह्यांच्या अधिकाराचा स्वतःवापर गैरवापर करून व फसवणूक करून नवचेतना अंतर्गत नवचेतना मल्टीपल निधि( बँक) व नव चेतना महिला उद्योग यांचेही राजीनामे तयार केले, व ऑनलाईन राजीनामे दाखवून या दोघींचे संस्थेशी असणारे संबंध संपूर्णतः रद्द केले व ज्योती सांबरे तसेच विजया कांबळे यांना संस्थेतून भागभांडवल धारक असताना बेदखल करून बाहेरचा रस्ता दाखवून शुद्ध फसवणूक तर केलीच परंतू सदरील नवचेतना संस्थेचे तिघिंचे जॉईंटअकाउंट महाराष्ट्र ग्रामिण बँकेत आगोदरच असताना मनिषा घुले यांनी या दोघिंच्या सह्यांचा अधिकार वापरून स्वतःच्या नावे वेगळे अकाऊंट काढून,नवचेतना महिला उद्योग च्या नावावर जिल्हा उद्योग केंद्र बीड येथून २५, लक्ष रुपये आम्हाला अंधारात ठेवून, कुठलीही कल्पना न देता उचलून हडप केले. हि माहिती सदरील महिलांना जिल्हा उद्योग केंद्रातून मिळाली असे अन्यायग्रस्त महिलांनी सांगितले. संयुक्तरित्या संस्थेअंतर्गत जे व्यवहार, कामे होतील व त्यातून होणारा नफा हा भागभांडवलदारांना वाटून घेण्याचे ठरले असताना आमच्या भागभांडवलावर उद्योग सुरू केले परंतू नफा ही हडप आणि भागभांडवल ही मनिषा घुले यांनी हडप केले, आमचे कोरे चेक, स्टँप पेपर हे सुद्धा वापस दिले नाहीअसे फसवणूक झालेल्या महिलांनी सांगितले. एकंदरीत सदरील नवचेतना सर्वांगीन विकास केंद्र.केज व संस्थेशी सलग्न असणारे सर्व उद्योग हे संस्थापक सचिवांच्या भ्रष्टाचाराच्या व फसवणूकिच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे संस्थेच्या संस्थापक सचिव मनिषा घुले यांच्या वर गुन्हा दाखल झाला आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel