भारतातील बोकारो, भिलाई, राऊरकेला, दुर्गापूर, बनपूर, विशाखापटणम इत्यादी महत्त्वाच्या स्टील उद्योगातील जवळजवळ ५४ हजार कामगारांच्या बोनसबाबत ५ ऑक्टोबर २०२१ रोजी दिल्लीत स्टील ऑथोरिटी इंडिया लि. व केंद्रीय कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये बैठक होऊन २०२१-२२ या वर्षाकरीता २१ हजार रुपये बोनस देण्याचा समझोता करार झाला, अशी माहिती स्टील मेटल अँड इंजिनिअरिंग वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया (SMEFI) चे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांनी दिली .
या बैठकीबाबत माहिती देताना संजय वढावकर यांनी सांगितले की, मागच्या २०२०-२१ या वर्षाकरीता कर्मचाऱ्यांना १६ हजार ५०० रुपये बोनस जाहीर झाला होता. आता सन २०२१-२२ या वर्षासाठी सर्व कर्मचाऱ्यांना २१ हजार रुपये बोनस वाढवून देण्याबाबत या बैठकीत समझोता झाला आहे. सदर समझोत्यातील बोनस हा स्टील उद्योगातील सर्व युनिटमधील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. जे नॉन कार्यकारी प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनाही १९ हजार रुपये बोनस दिला जाणार आहे.
सदर समझोत्यावर स्मेफीचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर, राजेंद्रसिंह( हिंद मजदूर सभा ), आदित्य नारायण ( आयटक ), ललित मिश्रा ( सिटू ), संजय सिंग, विरेंद्र चोबे ( इंटक ), डी.के. पांडे, ( भारतीय मजदूर सभा ) व व्यवस्थापनाच्या वतीने संचालक के. के. सिंग यांनी सह्या केल्या आहेत.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख
हिंद मजदूर सभा, महाराष्ट्र
COMMENTS