| पंचनामा करतांना तलाठी श्री पाटील, कृषी सहायक लिंगापुरे शेतकरी मन्मथ रामा राजेवार केशवराव वारले ,रामा राजेवर |
नांदेड : मालेगाव येथील शेतकरी रामा सदाशिव राजेवार या शेतकऱ्याच्या शेतात जमा करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावली .त्यामुळे शेतकर्यांचे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे अर्धापूर पोलीस मालेगाव तलाठी कृषी सहायक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मालेगाव येथील शेतकरी रामा सदाशिव राजेवर यांचे धामदरी गावाजवळ शेत आहे. दोन एकर सोयाबीन कापून त्यांनी खळे करण्यासाठी जमा केले होते पावसात भिजू नये म्हणून काल दि.६ रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने सदरील सोयाबीनच्या गंजीवर पेट्रोल टाकून आग लावली यात शेतकऱ्यांचे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे . अशा प्रकारच्या काही घटना या भागात घडल्या आहेत त्यामुळे पोलिसांनी आरोपींना पकडून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .
सदर शेतक-याला प्रशासनाने नुकसानभरपाई द्यावी व विम्याची जोखीम रक्कम मिळावी अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केली .
COMMENTS