नांदेड.(विशेष प्रतिनिधी) धनेगाव-मुजामपेठ ग्रामपंचायतचे सरपंच पिंटू पाटील उर्फ गंगाधर शिंदे यांची अ. भा. 'सरपंच' परिषदेच्या नांदेड (दक्षिण) जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल धनेगाव येथील ग्राम पंचायत कार्यालयात ७ ऑक्टोबर रोजी ग्रा. पं. सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सरपंच पिंटू पाटील उर्फ गंगाधर शिंदे यांचा सत्कार करण्यात आला आहे.
अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील व गोपाळ पाटील- ईजळीकर यांनी धनेगाव येथील ग्राम पंचायतीचे सरपंच पिंटू तथा गंगाधर शिंदे- पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून पिंटू पाटील यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नांदेड (दक्षिण)जिल्हाध्यक्षपदी नुकतीच एका नियुक्ती पत्राच्याद्वारे निवड केली. या निवडीबद्दल सरपंच पिंटू तथा गंगाधर शिंदे पाटील यांचा ७ ऑक्टोबर रोजी धनेगावातील त्यांचे सहकारी ग्राम पंचायत सदस्य तथा माजी उप सरपंच तातेराव ढवळे व संग्राम निलपत्रेवार यांच्यासह ग्रा. पं. सदस्य- शैलेंद्र ठाकूर, माधव जंगमे, रफिक भाई, राजेश बोटलावार, फारूक भाई तसेच नितीन शिंदे पाटील आदींनी सत्कार केला व पिंटू पाटील यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पत्रकार संभाजी सोनकांबळे व शिवाजी राजूरकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.
COMMENTS