कोरोणाचे नियम पाळण्याबाबत केले आव्हान
------------------------------------------------
नांदेड - उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर आपल्या मतदारसंघातील प्रत्येक आनंद महोत्सवात सहभागी होत असतात. नांदेड उत्तर मतदारसंघातील अनेक दुर्गामाता मंडळास भेटी देऊन भावीक भक्तांशी विविध विषयांवर चर्चा केली आहे. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी आवर्जून कोरोनाचे नियम पाळूनच धार्मिक कार्यक्रम साजरे करा, असे आवाहन केले आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोणाचे सावट असल्यामुळे अनेक सण साजरे करता आले नाहीत. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्यामुळे कोरोणाच्या नियमांचे पालन करून सण साजरे करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात दुर्गा माता मंडळ शहरात स्थापन करण्यात आले आहेत. भाविक भक्त देखील मोठ्या प्रमाणात मंडळांकडे दर्शनासाठी येत आहेत. नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी देखील आपल्या नांदेड उत्तर मतदारसंघातील विविध दुर्गामाता मंडळास भेटी देऊन भावीक भक्तांशी विविध विषयांवर चर्चा केली आहे. त्याबरोबरच तेथील विधिवत पूजा करून, भाविकांना स्वच्छता, कोरोणाच्या नियमांचे पालन करूनच या सणांचा आनंद घ्यावा व आपल्याला आगामी काळातील सण देखील याच हर्षल उल्हासात साजरे करता येतील असे आव्हान केले आहे.
COMMENTS