केज रमेश इतापे - येडेश्वरी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ या वर्षाचा ८ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता येडेश्वरी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे हस्ते झाला. कारखान्याचे संचालक बालकृष्ण भवर यांनीबॉयलरचे सपत्नीक विधिवत पूजन केले.या कार्यक्रमास माजी सभापती अशोक तारळकर,विलास सोनवणे,येडेश्वरी कारखान्याचे संचालक श्रीधर भवर पंचायत समिती सदस्य शिवाजी चौधरी,दत्तात्रय ठोंबरे, गुंडाप्पा भुसारी, शेतकरी सभासद ,बिगर सभासद ,कार्यकर्ते व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक बाळकृष्ण भवर यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले कि, निसर्गाने यावर्षी शेतक-यावर भरभरून प्रेम केले आहे त्यामुळे अतिरिक्त उसाची समस्या होण्याची शक्यता आहे त्याचा विचार करून बाप्पांनी अगोदरच नियोजन केले होते बाप्पा हे काळाची पावल ओळखणारा नेता आहे. हे आपले भाग्यच आहे.सर्वांनी आपण त्यांच्यावर प्रेम केले आहे त्यामुळे बाप्पांची जिम्मेदारी कुटुंब प्रमुख म्हणून शेतक-यांच्या ऊसाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल हे आता त्यांच काम आहे. यावेळी पुढे बोलताना भवर म्हणाले कि जे मंत्री, खासदार, राहिले त्यांनी स्वतःचे कारखाने बंद पाडले पण एक साधा जिल्हा परिषद सदस्य असताणारे शेतकरीपुत्र अनेक संकटावर मात करत येडेश्वरी कारखाना यशस्वीपणे चालवत आहेत हे तुमचं आमचं भाग्य आहे.असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपामध्ये बोलताना बजरंग सोनवणे यांनी येडेश्वरी साखर कारखान्याच्या उभारणी पासून अनेक दुष्काळाची संकट आली. अशा अनेक संकटावर मात करीत येडेश्वरी कारखाना आज यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. आज महाराष्ट्राच्या काण्या कोप-यात येडेश्वरी कारखाण्याचे नाव झाले आहे.तसेच महाराष्ट्रामध्ये गाळप परवान्यात येडेश्वरी कारखाना हा सातव्या क्रमांकावर आहे. राज्यात दिगाजाच्या कारखान्यांना अजून परवाना मिळाला नाही. पण आपल्याला मिळाला आहे.येणा-या काळात शेतक-याच्या खात्यावर उसाचे बिल १० व्या दिवशी जमा होईल याचे नियोजन करु. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीराम खांडेकर यांनी केले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
-
उमरी (प्रतिनिधी): कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह, फुलसिंग नगर (उमरी) येथे महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून रोपदान, ...
-
नांदेड: :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
-
उमरी (प्रतिनिधी): कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह, फुलसिंग नगर (उमरी) येथे महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून रोपदान, ...
-
नांदेड: :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक...
-
*वडेपुरी येथे केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने 'उत्सव स्वातंत्र्याचा' दोन दिवसीय विशेष प्रसिध्दीर अभियान संपन्न* (दिनांक 16.08.20...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गोपू महामुने मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेली...
COMMENTS