महिलासबलीकरण- म्हणजेच महिलांचे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक सक्षमीकरण.. डॉ. अलका नाईक – मानसोपचारतज्ज्ञ*

                                               *साथ साईस्पर्शची, जोड समाजकार्याची, ७ वर्ष अभिमानाची..**  साईस्पर्शचा ७ वा वर्धापनदिन एस.पी. ...


 

                                             *साथ साईस्पर्शची, जोड समाजकार्याची, ७ वर्ष अभिमानाची..** 

साईस्पर्शचा ७ वा वर्धापनदिन एस.पी. हॉल, कोकणी पाडा, दहिसर(पूर्व), मुंबई शनिवार  रोजी दि. २३/१०/२०२१ सायं. ६.०० वाजता मोठ्या उत्साहाने साजरा झाला. साईस्पर्श सेवाभावी संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून *साथ साईस्पर्शची* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात संस्थेच्या पोर्टलचे(https://saisparshsevabhavi.com) उद्घाटन करण्यात आले, ज्याद्वारे विभागातील नागरिक आपल्या समस्या नोंदवू शकतील व त्या संस्थेच्या माध्यमातून सोडविल्या जातील. तसेच *साईस्पर्श talk's* नावाने *युट्यूब चॅनलचे* उद्घाटन करण्यात आले ज्याद्वारे तरुणांना प्रेरणादायी अशा मुलाखती भविष्यात घेतल्या जातील.

 **उपस्थित मान्यवर* 

१) मा. श्री प्रवीण (भाऊ) दरेकर (विधान परिषद - विरोधीपक्ष नेता)

२) मा. श्री प्रकाश (दादा ) सुर्वे (स्थानिक आमदार - मागाठाणे विधानसभा)

३) मा. सौ सुजाता (ताई) पाटेकर (स्थानिक नगरसेविका -प्रभाग क्र. ४)

४) मा. श्री. सुरेश गोपाळे (ज्येष्ठ पत्रकार)

विशेष आमंत्रित

व्याख्यान: १) मा. डॉ. अलका नाईक

-मानसोपचारतज्ज्ञ, शिक्षणतज्ञ, प्राध्यापिका, कवयित्री, लेखिका, संपादिका, प्रशासिका, पत्रकार, समाजसेविका- महिला सबलीकरण.

 मुलाखत: २) मा. सौ. हेमलता वाजे - पोलीस उपनिरीक्षक

कार्यक्रमाचे स्वरूप: 

      कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. 

       त्यानंतर संस्थेच्या प्रतिकाचे (झेंड्याचे) व ऑनलाईन website (प्रभागातील समस्यांना आवाज मिळवून देण्यासाठी समस्या निदान पोर्टल ) ह्याचे अनावरण उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तसेच मा. डॉ. अलका नाईक मॅडम यांचा संस्थेतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी “ *महिला सबलीकरण* ”- म्हणजेच मानसिक, शारीरिक आणि सामाजिक सक्षमीकरण तसेच *“ *अवयवदान, केशदान- आजच्या काळाची गरज”** ह्यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना डॉ. अलका नाईक यांनी अतिशय सहज सोप्या भाषेत मानसिक स्वास्थ्याचे महत्व विषद केले आणि आपल्या भावपूर्ण शब्दांत पुढच्या पिढीला घडविण्यासाठी *आईचे महत्व आणि जबाबदारी वर्णन करणारी स्वरचित कविता गाऊन सर्व श्रोत्यांची मने जिंकली* ...अनेकांना आपल्या भावना आणि अश्रू आवरणे कठीण झाले.

नंतर मा.सौ. हेमलता वाजे मॅडम यांचा सत्कार करून त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली; ज्यात त्यांच्या आयुष्यातील संघर्षावर प्रकाश टाकण्यात आला व त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासंबंधी परीक्षांच्यासंदर्भात तरुण मुलांना मार्गदर्शन केले.

  तसेच कार्यक्रमात मा. श्री प्रवीण (भाऊ) दरेकर (विधान परिषद - विरोधीपक्ष नेता), यांनी *शुभेच्छा देताना संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली . मा. श्री प्रकाश (दादा ) सुर्वे (स्थानिक आमदार - मागाठाणे विधानसभा),  मा. सौ सुजाता (ताई) पाटेकर (स्थानिक नगरसेविका - प्रभाग क्र. ४), मा.श्री. सुरेश गोपाळे (ज्येष्ठ पत्रकार) ह्यांनी संस्थेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन केले. 

      त्याचबरोबर कार्यक्रमात दहिसर विभागात कोरोना काळात कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, सफाई कर्मचारी ह्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सांस्कृतिक खेळ- रोप मलखांबामध्ये राज्यस्तरावर विशेष कार्य केलेल्या खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला. या सर्व कार्याबद्दल संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel