सेलू : देशातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी ज्ञानदाना सोबतच विद्यार्थ्यांना विवेकवादी शिक्षण द्यावे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत त्यांच्यामध्ये सद्सद् विवेकबुद्धी जागृत करण्याची आज आवश्यक आहे. ज्यामुळे देशाची तरुण पिढी स्वतंत्र विचार करण्यासाठी सक्षम होईल आणि आपले व देशाचे भविष्य उज्ज्वल करेल असे प्रतिपादन डॉ. निपून विनायक ( रुसा, स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर) यांनी केले. ते शहरातील नूतन महाविद्यालय व रुसा तर्फे बुधवार ( दि.१३ ) रोजी आयोजित मार्गदर्शन शिबिरादरम्यान बोलत होते. 'शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक संस्थेने केलेले प्रयत्न व शैक्षणिक संस्थांचा दर्जा व विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून उच्च शिक्षणाचा प्रभाव ' या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक. डॉ निर्मला पद्मावत यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थी व शिक्षक यांचे वेगवेगळे गट करून त्यांमध्ये गटचर्चा करण्यात आली. या चर्चेतून शिक्षण क्षेत्रातील साधक, बाधक चर्चा करण्यात आली. यानिमित्त चर्चेतील मुद्यांना अनुसरून डॉ. विनायक यांनी उपस्थितांशी संवाद साधला. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांनी सदैव प्रयत्नशील असावे असे ते पुढे बोलताना म्हणाले. शिबिरास प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे ( मानवत ), प्राचार्य डॉ. सातपुते ( सोनपेठ ), प्राचार्य डॉ शेख बाबर ( परभणी ), डॉ. प्रशांत वक्ते, डॉ. गंगणे, शंतनू पवार( रुसा) , महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक यांचीही उपस्थिती याप्रसंगी होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अर्चना पत्की तर आभार प्रा. प्रसाद पांडे यांनी मानले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
-
उमरी (प्रतिनिधी): कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह, फुलसिंग नगर (उमरी) येथे महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून रोपदान, ...
-
नांदेड: :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
परभणी: परभणीच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राचा भक्कम पाठीराखा, उत्कृष्ट संघटक व हजारो खेळाडूंचे भवितव्य घडवणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व प्रा....
-
उमरी (प्रतिनिधी): कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह, फुलसिंग नगर (उमरी) येथे महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून रोपदान, ...
-
नांदेड: :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक...
-
*वडेपुरी येथे केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने 'उत्सव स्वातंत्र्याचा' दोन दिवसीय विशेष प्रसिध्दीर अभियान संपन्न* (दिनांक 16.08.20...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून गोपू महामुने मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेली...
COMMENTS