धर्माबाद (अहमद लड्डा) छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची 386 वी जयंती अखिल भारतीय जिवा सेना संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली आहे. यावेळी वीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
शिवरत्न वीर जिवाजी महाले हे शिवरायांच्या निष्ठावंत मावळ्यांपैकी एक होते. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांवर होणारा वार आपल्या अंगावर घेऊन सय्यद बंडा नावाच्या शत्रूपासून महाराजांचे रक्षण केले. तेव्हापासून होता “जीवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण रूढ झाली. त्यांच्या पराक्रमाला जयंतीदिनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी अखिल भारतीय जिवा सेना संघटनेचे ता.अध्यक्ष सज्जन दत्तात्रय सिरजखोडकर, गजानन सज्जन, संतोष गायकवाड, अशोक कार्लेकर, श्रीनिवास सज्जन, दिंगाबर पांघरे,माधव शेळगावकर, राजू पांघरे,संतोष विभूते, विद्याचरण बारडवार व पत्रकार गंगाप्रसाद सोनकांबळे आदी उपस्थित होते.
COMMENTS