------------------------------------------------------- नवी मुंबईतील सानपाडा येथील सेक्टर ७ मधील पार्क व्ह्यू गृहनिर्माण सहकारी संस्थेने ऍड...
-------------------------------------------------------
नवी मुंबईतील सानपाडा येथील सेक्टर ७ मधील पार्क व्ह्यू गृहनिर्माण सहकारी संस्थेने ऍडव्हान्स आय हॉस्पिटल अँड इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने १० ऑक्टोबर २०२१ रोजी मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित केले होते. पार्क व्ह्यू गृहनिर्माण सोसायटीत चार इमारती असून ६० सभासद आहेत. या सोसायटीतील जवळजवळ १०० लोकांनी आपले डोळे तपासून घेतले. या समाजोपयोगी कार्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष किशोर नारायणे, सेक्रेटरी विष्णुदास मुखेकर, खजिनदार एस. नाथन, सदस्य विश्वास कहाडने, राम जुंगारे, सुरेश गुप्ता व इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
आपला
मारुती विश्वासराव
COMMENTS