नायगाव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार)
शाळेत उशिरा आल्याचा जाब विचारणाऱ्या पालकास अश्लील शिविगाळ करणारा मुगाव येथील जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकाचा व्हिडीओ जिल्हाभर गाजला होता. त्यांची हि वर्तणूक शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी असल्याने त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून. नायगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दि. ७ रोजी निलंबनाचे आदेश काढल्याने खळबळ उडाली आहे.
मुगाव ता. नायगांव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेख नजीर पीर अहेमद यांनी शाळेत उशिरा तर आलेच पण काही शिकवणी करत नसल्याचा जाब एका पालकाने दि. ७ रोजी विचायला विचारला असता शेख नजीर यांनी अश्लील व अशोभनीय भाषा वापरली. एक शिक्षक अशी भाषा वारत असतांनाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दखल घेत तातडीने कारवाई केली आहे.
सदरच्या वादग्रस्त मुख्याध्यापकाचे निलंबनाचे आदेश नायगावच्या गट शिक्षणाधिकांनी काढले असून. शेख नजीर पीर अहेमद जि. प्र. प्रा. शा. मुगाव केंद्र गडगा ता. नायगांव मुख्याध्यापक यांनी शिक्षकी पेशास अशोभनीय असे वर्तन केल्याचे दिसून येत असून त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक ) १९६७ च्या नियमांचा भंग केला असून सदर कृतीने विभागाची बदनामी झाल्याचे दिसून येते सदर बाब गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( वर्तवणूक) नियम १९६७ भंग केल्याच्या कारणावरून शेख नजीर अहेमद जि. प्र. प्रा. शा. मुगाव केंद्र गडगा ता. नायगांव यांना हे आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ नुसार सेवेतून निलंबित करीत आहे असे आदेशात नमूद केले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती नायगांव राहणार आहे.
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या मुजोर मुख्याध्यापकांने पालकासोबत अशोभनीय व अश्लील भाषा वापरल्याच्या प्रकाराचा मुगाव येथे तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
COMMENTS