मुंबई दि.९ :उत्तर प्रदेश,लखीमपुरम खेरी येथे शेतकऱ्यांवर झालेला हिंसाचार म्हणजे, स्वातंत्र्य पूर्वकाळी परदेशी कापडावर बहिष्कार घालतांना देशभक्त बाबूगेणूने ट्रकखाली स्वतःला झोकून दिले आणि इंग्रजांनी त्यांना गाडीखाली चिरडले त्या निष्ठूरतेची आठवण करून देणारी ही घटना आहे,अशा शब्दात राष्ट्रीय मिल.मजदूर संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष माजीराज्यमंत्री सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी या घटनेचा तिव्र निषेध केला आहे.लोकशाहीला काळीमा फासणारी ही घटना असून,उत्तर प्रदेश सरकारने गुन्हेगारांना पकडण्यास चलढकळफणा केला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने येत्या ११ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.त्याला सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी संपूर्ण पाठिंबा दिला आहे.या बंदमध्ये कामगारांनी सहभागी होऊन,या घटनेचा तिव्र निषेध करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान या महाराष्ट्र बंदला भारतीय कामगार सेनेने आपला संपूर्ण पाठिंबा दिला असल्याची माहिती, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिनभाऊ अहिर यांनी दिली आहे. ◆◆◆
COMMENTS