कॉटन ग्रीन येथे वाहन चालक व मालकांसाठी विश्रांतीगृहाचे उदघाटन*

देशाच्या विविध भागातून मुंबई गोदीच्या परिसरात अनेक आयात निर्यात मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांचे ट्रक व बस वाहतूक करणारे ड्रायव्हर येत असतात, त...


देशाच्या विविध भागातून मुंबई गोदीच्या परिसरात अनेक आयात निर्यात मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांचे ट्रक व बस वाहतूक करणारे ड्रायव्हर येत असतात, त्यांना कोणत्याही सुख सुविधा मिळत नव्हत्या. त्या चालक, मालक व तंत्रज्ञ या असंघटीत कामगारांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग संस्था ( NITIE ) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कॉटन ग्रीन येथे ज्येष्ठ कामगार नेते ऍड . एस. के. शेट्ये यांच्या हस्ते २२ ऑक्टोबर २०२१ रोजी विश्रांतीगृहाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी चालक, मालक व तंत्रज्ञ यांच्या समस्यांवर युनियनचे अध्यक्ष ऍड. एस. के. शेट्ये, युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज, नीतीचे अधिकारी प्रा.विवेकानंद खानापुरी, प्रा. शंकर मूर्ती, प्रा. निखिल मेहता यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

 बंदर व गोदी कामगारांचे श्रद्धास्थान व दैवत डॉ. शांति पटेल यांनी असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी जे स्वप्न पहिले होते. त्याच स्वप्नाचा एक भाग म्हणून तीन वर्षांपूर्वी कॉटनग्रीन येथे वाहन चालक - मालक व तंत्रज्ञ यांच्यासाठी काम करायला सुरुवात झाली. देशाच्या निरनिराळ्या भागातून येणारे ट्रक ड्रायव्हर, बस ड्रायव्हर व येथील स्थानिक वाहनमालक तसेच वाहन दुरुस्तीचं काम करणारे निरनिराळे तंत्रज्ञ यांच्यासाठी साधी पाणी पिण्याची सोयसुद्धा उपलब्ध नव्हती. म्हणून प्रथम येथे पाच हजार लिटरच्या दोन टाक्या उभारून प्रथम पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली व त्याच वेळी वाहनचालक, मालक व तंत्रज्ञ यांच्यासाठी एक विश्रांतीगृह (Rest Room) सुरु करण्याचे ठरविले होते. त्यानुसार तात्पुरता निवारा म्हणून विश्रांती गृहाची उभारणी केली.

याप्रसंगी राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, पवई (NITIE) यांच्या अधिपत्याखाली युनियनच्या सहकार्याने या संस्थेमार्फत "एक नई शुरुवात" या डॉक्युमेंटरी फिल्मचे प्रकाशन करण्यात आले.सदर फिल्ममध्ये वाहनचालक व मालक यांना भेडसावणाऱ्या निरनिराळ्या समस्यांवर उपाय शोधताना या क्षेत्राशी निगडित निरनिराळ्या घटकांचं राष्ट्रीय संपत्तीमधील योगदान लक्षात घेऊन प्रत्येक घटकाच महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करण्यात आलं आहे. पुढील काळात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या असंघटित क्षेत्रातील अनेक योजना राबविताना योग्य तो समन्वय रहावा म्हणून ही फिल्म या क्षेत्राशी निगडित विविध मंत्रालयांना सादर करण्यात येणार आहे.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण बाळकृष्ण लोहोटे व सूत्रसंचालन युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे यांनी केले तर आभार कार्यकर्ते बाबुराव जाधव यांनी मानले. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी अहमद काझी, निसार युनूस, संदीप कदम, शशिकांत बनसोडे, शीला भगत, मारुती विश्वासराव, विष्णू पोळ, कार्यकर्ते प्रदीप नलावडे, अशोक डफळ, गणेश पोळ, प्रवीण काळे तसेच चालक मालक कामगार संघटनेचे कार्यकर्ते शांताराम तोरस्कर,संजय कांबळे, उत्तम ढेरे, गणेश पोतदार, बाळू कोल्हे, मोहन टाकळकर,लक्ष्मण सूर्यवंशी, सुनील सरगर, माणिक निगडे,बाळा पेंढारकर,दिलीप शिंदे, गोरक्ष थोरात इत्यादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. 


आपला

मारुती विश्वासराव

प्रसिद्धिप्रमुख

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel