नायगांव प्रतिनिधी
(रामप्रसाद चन्नावार)
दिवंगत शंकरराव चव्हाणांच्या हे सदैव वेळातील वेळ काढून काँग्रेसच्या निष्ठवंताला आवर्जुन भेट घ्याचे त्या अनुषंगाने वडिलांच्या पाऊलवर पाऊल ठेवून देगलूर येथील दौरा करून पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाणांनी काँग्रेसचे जेष्ट तथा साहित्यिक भगवानराव पाटील भिलवंडे यांच्या नरसी येथील निवासस्थानी भेट घेत भिलवंडे परिवरसोबत संवाद साधला.
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक मंत्री ना.अशोकराव चव्हाणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भिलवंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांच्या परिवारासोबत संवाद साधला असून जिल्ह्याच्या राजकी
य वर्तुळात जेष्ठ साहित्यिक भगवानराव भिलवंडे हे खासदार, आमदार नसतांनाही सदैव एकनिष्ठ राहून कुठल्याही निवडणूकीत मताधिक्याचा पाऊस पडून आपल्या कर्तव्याचा ठसा कायम ठेवल्यामुळे दोन महिन्यात पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाणांनी भिलवंडे परिवाराची सलग दुसऱ्यांदा भेट घेतली हे विशेष
या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी भिलवंडे,काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाकभाई,उधोगपती प्रकाश भिलवंडे, शिवराज पाटील बामणीकर, राजेश भिलवंडे,माधव कोरे,शेख नजीरसाब बागवान, विनोद भिलवंडे, श्याम चौंडे,पांडुरंग बागडे, सय्यद आदम ,शेख सादिक यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS