नांदेड.(विशेष प्रतिनिधी) चोरटयांनी घराच्या दारावरील कडी-कोंडा, कुलूप तोडून घरातील कपाटातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण तब्बल ...
नांदेड.(विशेष प्रतिनिधी) चोरटयांनी घराच्या दारावरील कडी-कोंडा, कुलूप तोडून घरातील कपाटातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण तब्बल ४० ते ४५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी दुपारी नांदेडच्या सिडको वसाहतीतील रामनगर परिसरात उघडकीस आली.
नांदेडच्या 'सिडको' वसाहतीअंतर्गत असलेल्या एनडी-४, भागातील 'टोंपे' निवासातील रहिवासी प्रेमला भीमराव सांगवीकर या त्यांच्या मुली व नातीसह तीन ऑक्टोबर रोजी कार्यक्रमानिमित्त स्वस्तिकनगर, नांदेड येथील मुलीच्या घरी गेल्या होत्या. दरम्यान, सांगवीकर यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरटयांनी ३ ते ५ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्यादरम्यान, सांगवीकर यांच्या घराचे दारावरील कडी, कोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश मिळविला. त्याचवेळी, अज्ञात चोरटयांनी घरातील लोखंडी कपाटाचे दार तोडून कपाटातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण सुमारे ४०- ४५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे, असा उल्लेख प्रेमला सांगवीकर यांच्या तक्रारीत नमूद असल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.
याप्रकरणी प्रेमला भिमराव सांगवीकर यांनी दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर गव्हाणकर व त्यांचे अन्य सहकारी कर्मचारी याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
COMMENTS