विद्यार्थ्यां सोबत न्यायाधीशही झाल्या रॅलीत सहभागी
कार्यक्रमाची सुरुवात झाली संविधान वाचनाने
----------------------------------------------
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील सातेफळ येथील जिल्हा परिषद् उच्च माध्यमिक शाळेत आझादी का अमृत महोत्सव व पॅन इंडीया अवेअरनेस अंतर्गत विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या वतीने व न्यायाधीश एस. व्ही. जंगमस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली कायदे विषक जनजागरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
दि . १२ ऑक्टोबर सोमवार रोजी केज तालुक्यातील सातेफळ येथे कायदे विषयक शिबीर संपन्न झाले. शिबीराची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय राज्याचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबआंबेडकर आणि यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
शिबिराचे प्रास्ताविक करताना वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. दीपक मुंडे यांनी बेटी बचाव बेटी पढाव या योजनेचा उद्देश सांगितला
न्यायाधीश एस. व्ही. जंगमस्वामी यांनी असे सांगितले की, बेटी बचाव बेटी पढाओ; या योजनेची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २२ जानेवारी २०१५ रोजी हरियाणा पानिपत
COMMENTS