कुंटूर येथे उच्च शिक्षित मुलींच्या मातोश्रीचा सन्मान

नायगाव / प्रतिनिधी  ( रामप्रसाद चन्नावार ) समग्र शिक्षा जि.प.नांदेड व जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर आयोजित नवरात्र उत्सवा निमित्ताने कुंटूर न...



नायगाव / प्रतिनिधी 

( रामप्रसाद चन्नावार )

समग्र शिक्षा जि.प.नांदेड व जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर आयोजित नवरात्र उत्सवा निमित्ताने कुंटूर नगरीतील उच्चशिक्षित मुलींच्या मातोश्री (आईंचा) सन्मान सोहळ्याचे आयोजन दि 11 ऑक्टोबर 2021 रोजीकरण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुंटूर नगरीच्या सरपंच सौ.आशालता मारोतराव कदम होत्या तर प्रमुख उपस्थितीत सौ.गंगासागरबाई शिवाजी पा. होळकर, सौ. रेवती दुर्गम मॅडम सौ.सुमनबाई जाधव मॅडम, मुख्याध्यापक राजपूत सर, होते. या कार्यक्रमात अनेकांनी मनोगत व्यक्त केले . अध्यक्षीय समारोप करतांना सरपंच सौ.कदम म्हणाल्या की आजपर्यंत अनेक ठिकाणी उच्चशिक्षण घेऊन यश मिळवलेल्या मुलींचा, सन्मान करण्यात आला आहे. आणि तो सन्मान मी पाहत आले पण मुलींच्या आईंचा सन्मान आजपर्यंत कुठेच कोणीही केला नाही. ते पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने उच्चशिक्षित मुलींच्या आईंचा सन्मान करतांना मी पाहतोय हे अत्यंत सन्मानाची, आनंदाची बाब आहे. शाळेने हा उपक्रम राबविला त्यामुळे शाळेचे अभिनंदन करते. कारण मुलगी उच्चशिक्षित झाली आहे. हे अगदी बरोबर आहे. पण घरातून त्या मुलींना घडवणाऱ्या संस्काराचा म्हणजे आईंचा सन्मान करणे गरजेचे असते.आज कुंटूर च्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वतीने असा सन्मानहोतो आहे.आणि या सोहळ्यात सहभागी होऊन त्यांचा सन्मान करण्याच भाग्य मला जिल्हा परिषद शाळेच्या या कार्यक्रमामुळे मिळालं त्यामुळे मी शाळेचे आभार व्यक्त करते.या शाळेने अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत.हे मी जाणुन आहे.शाळेचे मुख्याध्यापक राजपूत सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने शिक्षणात देखील उंच भरारी घेतली आहे. हे देखील याठिकाणी नमुद करावंस वाटत. अशीच प्रगती शाळेची व्होवो आणि यापुढेही शाळेने असे चांगले उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त करते.आणि सर्व उच्चशिक्षित मुलींच्या आईंना नवरात्र उत्सव निमित्ताने शुभेच्छा देते. या वेळी .सौ.पद्मावती मनोहरराव चाटोरे,सौ. भारतबाई बाबुराव आडकीने, सौ.रंजना गंगाधर कदम, श्रीमती.गोदावरी लक्ष्मण कुंटूरकर, सौ.सुग्राबी कालेजी शेख, श्रीमती लक्ष्मीबाई शिवराम शहापुरे, श्रीमती.सुनीता जयवंत शिंगणे, मन्नीबी शेख, सौ. गंगासागर पिराजी वाघमारे, सौ. जनाबाई नागोराव सोमठाणे, सौ. स्वामी अरुणा संभाजी, सौ. अंजनबाई गोविंद कुंटूरकर, सौ. शमीम जाकीर शेख, सौ. अजिजा राजेसाब शेख, सौ. शाहीन करीम शेख, सौ. इंदुताई विश्वनाथ कोटमड, सौ. विजयमाला संभाजी कदम, श्रीमती फरजाना हैदर शेख, सौ. सुशीला नागोराव चाटोरे, सौ. शशिकला किशनराव हणमंते, सौ. रेणुका दिगंबर होळकर, सौ. सुरेखा व्यंकटराव कदम, सौ. सुशीलाबाई गोविंदराव कदम, सौ. रसिका राजेश्वर जोशी, सौ.शोभा भुमा सोनारे, सौ.उज्ज्वला मारोतीराव होळकर यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका सौ. लव्हेकर सायली साईनाथराव, सौ.कंतुलवार जयश्री मुकुंदराव, सौ.शिनगिरे गीताबाई सोपानराव, सौ.गायकवाड वर्षा विनायकराव, सौ. चाटोरे मीना मनोहरराव, सौ.वाघमारे अनुपमा पुंडलिकराव व सर्व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel