स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आज दि. ३१ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षात कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या हस्ते या दोन महान व्यक्तीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय संकल्प दिवस व राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
‘राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वत:ला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन. मी हि शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे. जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिच्छित करण्याकरिता माझे स्वत:चे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे’. अशी शपथ दिली.
यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलाणी, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम, प्रमोद हंबर्डे, रामदास खोकले, बबन हिंगे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोव्हीड-१९ च्या संसर्गजन्य आजारामुळे सामाजिक अंतराचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.
COMMENTS