*मुंबई दि.९:* ब्रिटिशांना चलेजावचा नारा याच मुंबईतून राष्ट्रीय नेत्यांनी दिला आणि देशात क्रांतीचा डोंंब उसळला.त्यातून देशाला स्वातंत्र्य मिळाले.म्हणूनच १९४२ च्या लढ्याचा हा ऐतिसिक ठेवा मुंबईला भुषणवाह ठरला आहे.मुंबईतील गिरणी कामगार गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळापासून येथे येऊन हुतात्मा स्मारकाशी नतमस्तक होऊन,इतिहासाला उजाळा देत आहेत.तेव्हा राष्ट्रभक्ती आणि आत्मबळ वाढविणारी ही परंपरा आम्ही पुढे नेऊ,असे उदगार राष्ट्रीय मिल मज मजदूर संघाचे अध्यक्ष माजीराज्यमंत्री सचिन अहिर यांनी गवालिया टँक मैदानावरील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करतांना म्हटले आहे.
आज ९ ऑगस्ट हुतात्मा दिनानिमित्त राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने ग्रँडरोड नानाचौक येथून सकाळी ठिक ९ वाजता गिरणी कामारांची मूक मिरवणूक गवालिया टँक मैदाना पर्यंत काढण्यात आली आणि हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आले. सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचे याकामी सहकार्य लाभले.
कोरोनाचे सर्व निर्बंध काटेकोरपणे पाळण्यात आले होते.गतवर्षी कोरोना महामारीने देशात शिरकाव केला आणि या दिनावर निर्बंधाचे सावट आले.मुंबईतील एन.टी.सी.च्या चार गिरण्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत.तरीही मोजक्या संख्येने उपस्थित राहून कामगार प्रतिनिधींनी आपला उत्साह कायम ठेवला.
मूक मिरवणूकीचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन अहिर,खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ (अण्णा) शिर्सेकर,सुनिल बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे,साई निकम यांनी केले. मिरवणुकीत संघाचे संघटन सेक्रेटरी, प्रतिनिधी,कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटिशांना भारत छोडोचा इशारा देण्यात आला. गांधीजींनी "करा किंवा मराचा "नारा दिला.त्या नंतर महात्मा गांधीजींसह कॉग्रेस श्रेष्ठीना अटक करण्यात आली.त्या विरुद्ध देशात संतापाची लाट उसळून आली आणि ९ ऑगस्टला सर्वत्र्यालढ्याचे आंदोलन पेटले,या आठवणी त्या वेळी जागविण्यात आल्या.
चलेजावच्या लढ्याचे हे ७९ वे वर्षे आहे◆◆

COMMENTS