गंगाखेड प्रतिनिधी तुषार उपाध्य
पतंजली योग समिती , स्वदेशी आखाडा , श्री ह भ प ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर गंगोत्री आश्रम गंगाखेड व संत जनाबाई महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या दरम्यान मोफत योग प्राणायाम शिबिराचे आयोजन प्रा धोंडीराम जी शेप , योगगुरु प्रा बी टी राठोड व निखिलजी वंजारे यांच्या नेतृत्वात तर युवा प्रभारी इंजि रामराव मुरकुटे , स्वदेशी आखाडा संस्थापक प्रकाशजी डिकळे , प्रा बी एस पवार यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली योगप्राणायाम प्रशिक्षण शिबिरास सुरुवात झाली . योग विशारद लक्ष्मण निरस व काशिनाथ हाळीघोंगडे यांच्या संकल्पनेतून जडीबुटी दिन व ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत हरिभक्त परायण ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात झाली . या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून मा नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे व सभापती रत्नाकर शिंदे राजूरकर तसेच डॉ प्रा सुर्वे लाभले .
शिबिराच्या माध्यमातून दुर्लक्षित लोकापर्यंत योग पोहोचविणे तसेच अध्यात्माला योगाची जोड देण्यासाठी गंगोत्री आश्रमातील सर्व साधकांनी या योग शिबिराचा लाभ घेतला . जडीबुटी दिनानिमित्त सर्व योग शिक्षकांना व योग साधकांना आयुर्वेदाबद्दल सखोल ज्ञान योगगुरु प्रा बी टी राठोड ,श्री वेंकटरावजी नागरगोजे व प्रा मारोती साळवे यांनी औषधी वनस्पती बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री राजू रेवनवार ,हनुमंत ब्याळे राजेश अंबुरे, मनोहर मोहनाळकर व ज्येष्ठ योग शिक्षक शिवलिंग सिसोदिया यांनी होम हवन करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची जबाबदारी पार पडली. जडीबुटी दिनानिमित्त औषधी वनस्पती अर्जुन या रोपट्याचे गंगोत्री आश्रमामध्ये लागवड करण्यात आली .या कामाची जबाबदारी प्रकाशजी डिकळे व स्वदेशी आखाडा येथील योग शिक्षक रवि आवंके , राम टोले, किरण शिंदे, राहुल अनावडे, श्याम कवटकवार यांनी पार पाडली. या शिबिरामध्ये महिला पतंजली योगशिक्षिका . तहसील प्रभारी चित्रा मोहनाळकर , योगशिक्षिका रोहिणी शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. 1 ऑगस्ट ते 09 ऑगस्ट पर्यंत योग शिक्षक म्हणून मार्गदर्शन योगशिक्षक गोविंदराव शिंदे , पत्रकार भागवत जलाले, केशव कानडे , श्री गिराम इतर योग साधकांनी पार पडले ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आपल्या देशासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान पतंजली परिवार कडून करण्यात आला भारत मातेच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारे गंगाखेड मधील सैनिक यांचा सन्मान ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने गंगोत्री आश्रम या ठिकाणी करण्यात आला. देशभक्तीच्या गीतावर नरेंद्रगिरी माध्यमिक विद्यालय रावराजुर येथील योग प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके करून दाखवली कठीणातील कठीण आसने करून दाखविल्याने योग साधकांची म्हणे प्रफुल्लित झाली . सारंगधर पवार,गोविंदराव शिंदे, जगन्नाथ आंधळे, दतराव चलवाड, मोहन काबलीतसेच इतर योगशिक्षकांनी या देशभक्तीच्या कार्यासाठी हिरारीने सहभाग घेतला . सुभेदार विश्वनाथ सातपुते , सुभेदार अर्जुन जाधव , सुभेदार काशीराम पौळ,नायब सुभेदार अशोक आयनीले , नायब सुभेदार मारोती लटपटे , नायब सुभेदार राम लटपटे व हवालदार धनराज मोरपडवार या सैनिकांनी योगशिक्षक व योगसाधकांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगगुरु प्रकाश डिकळे , योगविशारद लक्ष्मण निरस यांनी कार्यक्रमाचे संचलन तर प्रा बी एस पवार यांनी आभार मांडले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगशिक्षक व्यंकटराव शिंदे , ज्ञानोबा दुबे , साळवे सर , संघरक्षित गायकवाड , सूर्यकांत चिद्रवार , अशोक कुंभार , अभिनव लटपटे , शिवराज दुधाटे,स्वदेशी आखाडा येथील जाँबाज योगसैनिक व गंगोत्री आश्रम येथील ब्रह्मचारी साधकांनी सहकार्य केले .

COMMENTS