राम दातीर
माहुर (प्रतिनिधी )माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथील कब्रस्तान मध्ये रात्रीला अंत्यविधीसाठी जातांना मुस्लिम समाजाच्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची बाब हेरून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतीबा खराटे यांनी स्वतः च्या खर्चातून हायमॅक्स बसवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
गोंडवडसा येथील कब्रस्तान मध्ये रात्रीला सर्वत्र काळोख असल्याने दुःखद प्रसंगी रात्री अपरात्री अंत्यविधींसाठी जातांना मुस्लिम समाजाच्या नागरिकांना सरपटणा-या प्राण्यांचा त्रास सहन करावा लागत होता. त्यांची ती व्यथा जाणून ज्योतीबा खराटे यांनी स्वखर्चाने हायमॅक्स बसवून दिल्याने सय्यद जब्बार सर,सना मौलाना,हिदायत अली नवाब,शे.वकील,आरिफ खान,शे.जमीर,डॉ.रहीम खान,शे.फिरोज,जमीर टेलर,काजी कलीमोद्दीन,शे.जाकीर,शे.शफी,शे.आसिफ व तंटामुक्ती अध्यक्ष सलीम भाई यांचेसह अनेकांनी त्यांचे आभार मानले आहे.

COMMENTS