कोरोनाच्या महामारीत मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांकडे सरकारचे दुर्लक्ष
नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
मागिल दोन वर्षांच्या काळात इलेक्ट्रॉनिक मिडीया,प्रिंट मिडीया, फोटोग्राफी यांनी अवतीभवतीच्या घटनांचे अचुक वृत्तांकन संतुलीत करतांना कोरोनाच्या महामारीत जवळपास १५० हुन अधिक पत्रकारांचा मृत्यु झाला.असून एस.एम.देशमुख यांच्या सह अन्य जेष्ठ पत्रकारांनी वेळोवेळी निदर्शनास आणून दिले तरी राज्य सरकारने मृत्यू पडलेल्या पत्रकारांच्या कुंटुबियांकडे दुर्लक्ष करून त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे.या पेक्षा भयानक अवस्था ग्रामिण भागातील पत्रकारांची आहे. आपल्या साठी आपणच पुढाकार घेवून उपाय शोधला पाहीजे म्हणून संरक्षणासाठी आपत्कालीन निधी उभारण्याचा निर्धार मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर यांनी मांडला.व त्याची तात्काळ निधीची अंबालबाजावणी देखील करण्यात आली आहे.
नायगांव मराठी पत्रकार संघाच्या वतीने नायगांव येथील शासकीय विश्राम गृहात बैठक संपन्न झाली असून बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर हे होते तर तालुक्याचे प्रभारी लक्ष्मण भवरे,पत्रकारसंघाचे अध्यक्ष सय्यद जाफर,जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार,गंगाधर भिलवंडे,मनोहर तेलंग,गजनान चौधरी,पंडीत वाघमारे सह तालुक्यातील असंख्य पत्रकारांची उपस्थिती होती.
बैठकीला संबोधित करतांना सोनखेडकर म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून कुठल्याही सरकार असो वेळोवेळी पत्रकारांच्या विविध मागण्याकडे सदैव दुर्लक्ष करीत असल्याची खंत व्यक्त करून कोरोनाच्या काळात मृत्यु पडलेल्या नामांकित पत्रकारांच्या कुंटुबियांकडे हे सरकार आणि विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी लक्ष दिले नाही. ही खुप दुर्देवी बाब असून ग्रामीण भागातील पत्रकारांनी स्वाभिमाननी पत्रकारिता करत उठसूठ बातम्या घेणे टाळावे.तसेच आपल्या संरक्षणाकडे आपणच लक्ष दिले पाहिजेत याहेतूने नायगांव तालुक्यातील पत्रकारांचा आपत्कालीन निधी उभारून सुदैवाने कुठली घटना घडली तर त्यांना मदतीचा हात या निधी मधून देण्याचा निर्धार केला.तर त्यांचा कुंटुबियांसहित विमा काढण्याचा निर्णय घेत दरवर्षीला प्रत्येक पत्रकारकडून १ हजार रुपये घेण्याचा संकल्पना तब्बल चाळीस पत्रकारांनी घेतली असून यापुढे राज्य सरकारची आणि शासनाची अथवा राजकीय लोकप्रतिनिधी वाट न पाहता आपत्कालीन निधी उभारणार असा महत्वपूर्ण निर्णय नायगांव मराठी पत्रकार संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

COMMENTS