नांदेड.(विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या वामननगर भागातील रहिवासी तथा जेष्ठ नागरिक मिनाबाई मोहनराव कांजाळकर (वय- ६४ वर्षे) यांचे हृदयविकाराने १० ऑ...
नांदेड.(विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या वामननगर भागातील रहिवासी तथा जेष्ठ नागरिक मिनाबाई मोहनराव कांजाळकर (वय- ६४ वर्षे) यांचे हृदयविकाराने १० ऑगस्ट रोजी पहाटे निधन झाले. दिवंगत मिनाबाई कांजाळकर यांच्या पार्थिवदेहावर मंगळवार १० ऑगस्ट रोजी दुपारी नांदेडच्या 'गोवर्धन'घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, दोन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. नांदेडच्या 'सिडको' परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा उस्माननगर (ता. कंधार) येथील 'समता' माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील लिपिक विश्वेश्वर जहागीरदार लाठकर यांच्या 'त्या' सासुबाई होत.

COMMENTS