मारोती गणपती धुळगुडे सरांचे आज सकाळी हृदय विकारामुळे दुःखद निधन

 निशब्द..अतिशय दुःखद घटना.. *सादलापूर नगरीचे भूमिपुत्र व राणीसावरगावमध्ये वास्तव्यास असलेले, यशवंतराव होळकर माध्यमिक विद्यालय बोथी येथील कार...

 निशब्द..अतिशय दुःखद घटना..


*सादलापूर नगरीचे भूमिपुत्र व राणीसावरगावमध्ये वास्तव्यास असलेले, यशवंतराव होळकर माध्यमिक विद्यालय बोथी येथील कार्यरत प्रचंड मेहनती विद्यार्थीप्रिय मनमिळाऊ आदर्श शिक्षक आदरणीय मारोती गणपती धुळगुडे सरांचे आज सकाळी हृदय विकारामुळे दुःखद निधन झाले.*  लहानपणापासूनच गरिबीत संघर्षशील जीवन जगत सादलापूर ता. पालम या गावापासून त्यांनी आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केला. घरची हालाकीची परिस्थिती पण शिक्षण क्षेत्राची प्रचंड आवड असल्यामुळे काबाड कष्ट करीत शिक्षण शिकून ते बोथी येथे  विद्यार्थी घडविण्यासाठी  यशवंतराव होळकर माध्यमिक विद्यालयात शिक्षक पदावर रुजू झाले.पण शाळा कायम विनाअनुदानित असल्यामुळे कोटुंबिक खर्च भागवण्यासाठी राणीसावरगाव मध्ये ट्युशन घेऊन नवोदय, स्कॉलरशिप व 10 वी पर्यंतचे भरपूर विद्यार्थी घडविले.  सरांनी आपलं उभं आयुष्य शिक्षणसेवसाठी समर्पित केलं आताच सरांना 40%अनुदानित पगार चालू झाला होता, जीवनाचा प्रवास सुखी होईल व त्यांच्या तीन चिमुकल्यां लेकरांचे स्वप्न साकार करू असे स्वप्न पहात असतानाच नियतीने त्यांच्या कुटुंबावर दुःखाच्या डोंगराचा काळोख कोसळला.. धुळगुंडे सर व्यक्ती नसून महान व्यक्तींमत्व होते,म्हणतात *ना जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला* आम्हा सर्वांना आवडणारे व लेकरांना घडवणारे आदर्श शिक्षक,आदर्श वडील,धुळगुंडे सरांच्या आज अचानक जाण्यामुळे धुळगुंडे परिवाराची कधीही न भरून येणारी हानी झाली. एवढे मोठे दुःख पचवण्याची ताकत  सरांच्या कुटुंबियाला व सरावर प्रेम करणाऱ्या सर्वांना मिळो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.भावपूर्ण श्रद्धांजल

शोकाकुल ; समस्त राणीसावरगावकर.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group