सोनपेठ/प्रतिनिधी
मागील काही दिवसांपूर्वी सोनपेठ तालुक्यातील देविनगर तांडा येथील नामदेव भोजा राठोड यांचा अंगावर विज पडून मृत्यू झाला होता.पाथरी विधानसभेचे आ.सुरेश वरपुडकर व तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांच्या पाठपुराव्याने सदर मयताच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने ४ लक्ष रुपये आर्थिक मदत मिळवून देण्यात आली.
तसेच दुधगाव ता.सोनपेठ येथील अनुरथ गव्हाडे यांनी विष घेवून आत्महत्या केली होती.त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची गरज लक्षात घेऊन यासाठी आ.सुरेश वरपुडकर यांच्या पाठपुराव्याने शासनाकडून १ लक्ष रुपये आर्थिक मदत मिळवून देण्यात आली.
दोन्ही मयातांच्या कुटुंबीयांना तहसिल कार्यालयात मदतीच्या रकमेचे धनादेश युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस प्रेरणा वरपूडकर व तहसीलदार डॉ.बिरादार यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.मुंजाभाऊ धोंडगे,६युवा नेते सुमित पवार,पी.एस.राठोड,विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ कोलते,पप्पू मोकाशे,राजू सौदागर,नासेरभाई पठाण,खडक्याचे माजी सरपंच रामप्रसाद यादव,सचिन जगदाळे,विकास धमे,लक्ष्मण यादव,उत्तमराव राठोड,देवीनगरचे सरपंच राठोड,सुदर्शन कदम,जनार्दन डुकरे,चेअरमन बालासाहेब पवार,मारोती पवार,जगन्नाथ यादव,सुखदेव जाधव,सुधाकर जाधव,पोलिस पाटील जाधव उपस्थित होते.

COMMENTS