नांदेड: विशेष (प्रतिनिधी) कंधार तालुक्यातील हाळदा येथील शेतकरी तथा ट्रॅक्टरचालक जळबाजी बालाजीराव चक्रधर (वय-२८ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने उ...
नांदेड: विशेष (प्रतिनिधी) कंधार तालुक्यातील हाळदा येथील शेतकरी तथा ट्रॅक्टरचालक जळबाजी बालाजीराव चक्रधर (वय-२८ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान, २५ जुलै रोजी दुपारी विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर हळदा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, चार बहिणी, मेहुणे, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यातील पोलीस नाईक दिलीप चक्रधर-हळदेकर यांचे 'ते' चुलतभाऊ होत.

COMMENTS