नांदेड – आ. बालाजी कल्याणकर यांचे कट्टर समर्थक शिवसैनिक धनंजय पावडे यांच्या वाढदिवासानिमित्त पावडेवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर दि.25 रोजी रविवारी आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला असून 300 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या शिबिराची सुरुवात नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आली होती.
यावेळी आ. बालाजीराव कल्याणकर, तालुकाप्रमुख जयवंत कदम, युवासेना जिल्हाप्रमुख माधव पावडे, मा. सरपंच संभाजीराव पावडे, कामगार सेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब पावडे, तालुका संघटक नवनाथ काकडे, उप तालुकाप्रमुख संतोष भारसावडे, मा. सभापती मारोती रोडगे, सर्कल प्रमुख गणेश बोकारे, प्रभाकर सोनट्टके, गजान धुमाळ, विजय कदम, शरद कदम, माधव पावडे, अनिल पावडे, सरपंच रमेश लोखंडे, ग्रा. प. सदस्य राम पावडे, रमेशराव पावडे, मा. प.स. सदस्य निरंजन पावडे, शिवाजी पावडे, सुनिल पावडे, गजानन पावडे, भास्कर पावडे, मुन्ना पावडे, नरोजी राऊत, मोहन पावडे, निळकंठ पावडे, उमेश पावडे, साहेबराव पावडे, मारोती पावडे,यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. सुनिल बरगे, डॉ. अनिल अग्रवाल यांनी नागरिकांची आरोग्य तपासनी केली. धनंजय पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन माधव पावडे व अनिल पावडे यांनी केले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून तीनशे जणांनी आरोग्य तपासणी करून घेतली आहे.

COMMENTS