*तातडीने काम करण्याची सरपंच बेबीसरोज मोकाशेची मागणी*
सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या अधिपत्याखाली करण्यात येणाऱ्या कामाचा मागील अनेक दिवसांपासून बोजवारा उडाला उडाल्याने आणि करण्यात येणारे काम अत्यंत बोगस असल्याने मागील वर्षी राज्य पातळीवर या रस्त्याच्या कामाचा प्रश्न गाजला होता.
बोगस कामे करत स्व:तचे उखळ पांढरे करत सामान्य नागरिकांच्या जीवीतहानीस कारणीभूत ठरणाऱ्या गुत्तेदारावर कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर मोकाशे यांनी लावून धरली होती.त्यानंतर ग्रामीण रस्ते विकास संस्था पुणे यांच्याकडुन साईनाथ कन्ट्रक्शन कंपनी परळी कडून काम काढून घेत नव्याने निविदा प्रक्रिया काढण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले मात्र गेंड्याचे कातडे पांघरणाऱ्या प्रशासनाकडून याबाबत वर्ष उलटले तरीही कोणतीच कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.सदर कामाची निविदा प्रक्रिया राबवून तत्काळ करुन देण्याची मागणी कान्हेगावच्या सरपंच बेबीसरोज मोकाशे यांनी आता केली आहे.सदरच्या कामाची सुरू करण्याची प्रक्रिया न झाल्यास कोरोना महामारीत आंदोलन करण्याचा इशारा सदर निवेदनात दिला आहे.सदरचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयास देण्यात आल्याचे कळते.
सोनपेठ तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून ग्रामीण भागातील रस्त्यांसह मुख्य रस्त्यांना भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे.यात जबाबदार अधिकाऱ्यांनीही आपले हात ओले केले असून सोनपेठ तालुक्याच्या विकासाचा फज्जा अधिकारी आणि पांढऱ्या कपड्यातील बगळ्यांनी उडवला आहे.यामुळेच सामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ खेळण्याचे प्रकार रस्त्याच्या माध्यमातून समोर येत आहेत.सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव-शिर्शी-शिरोरी या रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यावर उपचारास पोहचायला वेळ झाल्याने सहा लोकांना जीव गमवावा लागला आहे.
गुत्तेदार,पोटगुत्तेदार,लोकप्रतिनिधी यांनी मलईचा खेळ चालवला आहे.सोनपेठ तालुक्यातील प्रलंबित रस्त्याच्या कामाची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने मिळवून यावर तक्रार दिली असता.या तक्रारीतून बाहेर जिल्ह्यातील गुत्तेदार आणि पोटगुत्तेदार यांनी आपले उखळ पांढरे केल्याचा प्रकार समोर आला आहे.यात राज्यमार्ग २२५ ते शिर्शी-शिरोरी-कान्हेगाव-खडका या रस्त्याचे काम असल्याचे प्रामुख्याने दिसून येते
दरम्यान या रस्त्याचे काम सुरु करण्यात यावे व निकृष्ट दर्जाचे काम करुन काम प्रलंबित ठेवणाऱ्या गुत्तेदारावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर मोकाशे यांनी जिल्हा पातळीपासून ते राज्य पातळीवर आंदोलन केले होते.तेव्हा या रस्त्यासाठी नेमण्यात आलेल्या गुत्तेदारावर कारवाई करण्यात आली होती.मात्र वर्ष उलटूनही सदर कामाची प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही.

COMMENTS