नायगाव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार ) शरदचंद्र महाविद्यालखय नायगांव येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित शिव स्वराज्य दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा.डॉ. शंकर गड्डमवार यांनी स्वतःशिवराज्याभिषेक करण्यामागची पाश्र्वभूमी विषद केली आणि हा सोहळा म्हणजे त्या काळातील देशातील व परकीय सत्तेपासून जनतेला गुलामीतून मुक्त करण्यासाठी शिवराज्यभिषेक करण्याचे ठरविले. हा सोहळा 6 जून 1674 रोजी झाला असला तरी त्या अगोदर 29 मे 1674 पासून सुरू झाला होता एकून नऊ दिवस हा सोहळा चालला असून नवव्या दिवशी राज्याभिषेक करून शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणून घोषित करण्यात आले. शिवरायाच्या राजामध्ये कधीही जात धर्म यावरून भेदभाव नव्हता तर उलट सर्व जाती व धर्माना समान संधी व समान प्रतिष्ठा देण्यात आली होती.आज हाच दिवस महाराष्ट्र शासनाने शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे त्या निमिताने शरदचंद्र महाविद्यालयात हा दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रा.डॉ. शाम पाटील, प्रा.सुरज अंजणीकर, शिवाजी मोहिते, बालाजी कावडे,बालाजी काळे, संतोष भालेराव व देवीदास भाकरे ईत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS