केज ! रमेश इतापे
केज तालुक्यातील सोनिजवळा येथे शिवस्वराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.
६ जून रोजी शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक होऊन ते छत्रपती शिवाजी महाराज झाले. त्या निमित्त महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सोनिजवळा येथील ग्रामपंचायतीत शिवस्वराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी सरपंच मुकुंद गायकवाड यांच्या शुभहस्ते स्वराज्य ध्वज व स्वराज्य गुढी उभारून शिवस्वराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सरपंच मुकुंद गायकवाड , उपसरपंच दादासाहेब कोकाटे , ग्रामविकास अधिकारी राजाभाऊ वरपे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राऊत सर, सांगळे सर, गुंड सर, अंधारे सर ,वडणे सर, दौंड सर, ग्रामपंचायत सदस्य चकु पटेल, राजाभाऊ इंगळे, व गावातिल नागरीक रामकृष्ण भांडवलकर ,सोपान ससाणे, मनोज गिरी, अमर गिरी, अंगनवाडी सेवीका, आशा वर्कर आणि पत्रकार दशरथ चवरे हे उपस्थित होते
या कार्यक्रमाची सांगता गर्जा महाराष्ट्र माझा या गिताने सांगता करण्यात आली,

COMMENTS